महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये पंढरीनाथ कांबळेनं वर्षा उसगावकरला कॅप्टन्सी टास्कदरम्यान चांगलच सुनावलं, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi 5 - BIGG BOSS MARATHI 5

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन बनण्यासाठी घरातील सदस्य प्रयत्न करताना दिसत आहेत. आता सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल झाला आहे. यामध्ये पंढरीनाथ कांबळे हा वर्षा उसगावकरला सुनावताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 3:17 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये आता घरातील सदस्यांमध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी लढत पाहायला मिळत आहे. या टास्क दरम्यान घरात जोरदार राडा देखील होईल, हे आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉस निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये घरातील सदस्य कॅप्टन्सी टास्क जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी 5'च्या नवीन प्रोमोमध्ये चार दावेदारांमध्ये कॅप्टन होण्याची स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो :वर्षा उसगावकर सूरज चव्हाण आणि अरबाज पटेल यांना दुसऱ्यांदा कॅप्टन होण्याची संधी मिळत आहे. तसंच आता धनंजय पोवार पहिल्यांदा कॅप्टन होण्याच्या शर्यतीत आहे. कॅप्टन पदाच्या टास्कसाठी उमेदवारांना भांड्यातील पाणी प्यावे लागेल. कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणाचं गोड पाणी, कोणाची तहान भागेल, हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये वर्षाताई घरातील सदस्यांना म्हणतात, "आपली तहान भागवा." यानंतर अरबाज म्हणतो, "हे खूप गोड पाणी आहे." यावर निक्की म्हणते, "कालपर्यंत तुझ्यामध्ये एवढा कडूपणा होता, आता अचानक तुझं पाणी इतकं गोड कसं झालं?" यानंतर प्रोमोत पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे वर्षाताईंना म्हणतो, "तुम्हाला विश्वास होता, ताई की आम्ही पाणी पिऊ." यावर वर्षाताई म्हणतात, "हो मला वाटलं होतं. "

पॅडी झाला वर्षाताईंवर नाराज :यानंतर पुढं पंढरीनाथ म्हणतो, "स्ट्रॅटीजी करायला तुम्ही त्यांच्याबरोबर बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार." यानंतर वर्षाताई या नाराज होताना दिसल्या. पॅडीनं वर्षाताईंना थेट सुनावल्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियावर त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता घरामधील नवीन कॅप्टन कोण होणार, याबद्दल देखील सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र अनेक स्टार्स वर्षाताईंना सपोर्ट करत आहेत. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून वर्षाताईला वोट करण्याबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. अरबाज पटेल-संग्राम चौगुलेमध्ये होणार राडा, कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो व्हायरल - bigg boss marathi
  2. आर्या जाधवनंतर वैभव चव्हाणला शोमधून 'बिग बॉस'नं दाखवला बाहेरचा रस्ता, नवीन प्रोमो रिलीज - Bigg Boss Marathi
  3. अभिजीत सावंत आणि पंढरीनाथ कांबळेमध्ये रंगली चर्चा, अरबाज पटेलला आहे धोका ? - Bigg Boss Marathi

ABOUT THE AUTHOR

...view details