मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो दिवसेंदिवस खूप धमाकेदार होत आहे. 'बिग बॉस मराठी 5'च्या सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आता या आठवड्यातदेखील घरात प्रेक्षकांना कल्ला ऐकाला मिळणार आहे. 'बिग बॉस'च्या घरात आता नुकतेच नॉमिनेशन टास्क पार पडलं. त्यानंतर आता घरातील वातावरण सध्या तापलं आहे. नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर सध्या नाराज आहेत. त्यामुळे जान्हवी किल्लेकर आणि घनःश्याम दराडेमध्ये देखील आता वाद पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस' च्या निर्मात्यांनी एक सोशल मीडियावर प्रोमो शेअर केला आहे.
जान्हवी आणि घनःश्यामचा वाद : या प्रोमोमध्ये जान्हवी घनःश्यामची अक्कल काढत तावातावाने बोलताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अंकिता आणि घनःश्याम भांडत असताना घरातील सदस्य, या वादापासून दूर राहिलेले दिसतात. दोघांत भांडण होत असताना कोणीही त्यांना शांत राहण्यास सांगितलं नाही. प्रोमोत जान्हवी म्हणते, "सगळ्यांना माहिती आहे, तुला अक्कल नाही. तुला अख्ख्या घरानं नॉमिनेट केलंय." यानंतर घनःश्याम म्हणतो, "मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही." यानंतर घनःश्याम जान्हवीला फटकारताना दिसतो. यावर जान्हवी म्हणते,"तुझी अक्कल शून्य आहे." पुढं घनश्याम तिला ''चल-चल'' म्हणत तिच्यावर चिडताना दिसतो.