हैदराबाद- कलर्स टीव्हीवरील बिग बॉस मराठीचा सीझन संपताना अजून कोणतं धक्कादायक वळणं पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. ग्रँड फिनालेमध्ये सुरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोली, अभिजीत सावंत आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात विजेतेपदासाठी आज जोरदार टक्कर असणार आहे. विजेते पदासाठी प्रेक्षकांची मते सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहेत.
बिग बॉस मराठीत कोण ठरणार विजयी? ग्रँड फिनालेच्या रंगतदार सोहळ्यात आज होणार घोषणा - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI
अभिनेता रितेश देशमुखनं पहिल्यांदाच सूत्रसंचालन केलेला बिग बॉस मराठी कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. बिग बॉस मराठीचा विजेता कोण? याची आज ग्रँड फिनालेमध्ये घोषणा होणार आहे.
Published : Oct 6, 2024, 12:56 PM IST
|Updated : Oct 6, 2024, 1:19 PM IST
बिग बॉसमधील विविध टास्कमुळे स्पर्धकांच्या मानसिक आणि भावनिक ताकदीची परीक्षा होते. कधी वाद होतात तर कधी मैत्रीचे संबंध होतात. स्पर्धकांच्या बिग बॉसमधील खेळावरून मनोरंजनाच्या कामगिरीवरून आणि वागण्यावरून त्याची लोकप्रियता ठरले. यंदाच्या बिग बॉस मराठी सीझनमधील स्पर्धकांची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. विशेषत: आई-वडील नसताना संघर्ष करत सुरज चव्हाण यानं सोशल मीडिया स्टार म्हणून मिळविलेलं यश अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारं ठरले. अभिनेता रितेश देखमुखनं सूत्रसंचालन करताना सादर केलेला 'भाऊचा धक्का'मधून अनेकदा स्पर्धकांची फिरकी घेतली. तर कधी मार्गदर्शक सूचनादेखील स्पर्धकांना केल्याचं दिसून आलं.
- बिग बॉस मराठी 5 ग्रँड फिनाले आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. यावेळी स्पर्धकांचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे शोमधून बाहेर पडालेले स्पर्धकदेखील यावेळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांना हा शो कलर्स मराठीसह जिओ टीव्हीवर पाहता येणार आहे. विजेत्याची घोषणा जाहीर झाल्यानंतर ट्रॉफी आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे.
बिग बॉसमधील स्पर्धकांमध्ये कोणाचे पारडे जड असेल?
- 'गुलीगत' सुरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' या डायलॉगसह डान्सच्या स्टेपला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. त्याचा साधेपणा आणि माणुसकीनं वागण्याची वृत्तीचं बिग बॉसनंदेखील कौतुक केलं.
- धनंजय पोवारनं वडील कधीही कौतुक करत नसल्याचं म्हटलं होते. या शोमध्ये त्याचे वडील भेटायला आल्यानंतर धनंजय हमसून हमसून रडला. त्याच्या खेळाचं वडिलांनी कौतुक केले. पिता-पुत्राचे हे नाते पाहून अनेकजण भावूक झाले.
- निक्की तांबोळी ही तिच्या रोखठोकपणामुळे आणि आक्रमक वागण्यामुळे अनेकदा वादात सापडली. "बाई, काय हा प्रकार" तिचा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला.
- अभिजीत सावंतनं शांतपणे वागत असताना कोणत्याही वादात अडकण्याचे टाळले. त्यानं स्वत:ची एक सभ्य व्यक्ती म्हणून प्रतिमा काय टिकविली आहे. चांगल्या गायनाबरोबरच डान्स करून त्यानं प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन केले.
- एकटी डाव खेळणार असल्याचा दावा करणारी जान्हवी ही खंबीर स्पर्धक आहे. अभिनेत्री वर्षा ऊसगावकर शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचा अंतिम फेरीत प्रवेश झाला.
- अंकिता वालावलकर ही जिद्दीनं खेळणारी स्पर्धक आहे. ती अनेकदा चांगली व्यक्ती म्हणून राहण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. धनंजय पोवार आणि माझ्यात मीच विजयी व्हावे, अशी तिने इच्छा व्यक्त केली होती.