मुंबई : ' बिग बॉस 18'चा पहिला 'वीकेंड का वॉर' पार पडला आहे. हा सीझन खूपच मनोरंजक असल्याचे दिसत आहे. या शोमध्ये रोजचं प्रेक्षकांना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस'च्या घरात बॉलिवूड आणि टीव्हीचे अनेक सेलिब्रिटी आले आहेत. रविवारी सलमान खाननं शोमधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली. पहिल्या 'वीकेंड का वार'मध्ये 19व्या स्पर्धकाला शो सोडावा लागला. आता 'बिग बॉस'च्या घरात 18 स्पर्धक आहेत. यांच्यात आता जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 18'मधून बाहेर काढल्या गेलेला स्पर्धक कोण आहे, याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कोण गेलं घरातून बाहेर ? : होस्ट सलमान खाननं घोषणा केली की, 'या आठवड्यात 19वा स्पर्धक म्हणजेच गधराज घराबाहेर असेल आणि इतर सर्व सदस्य सुरक्षित असतील. सलमानच्या या घोषणेनंतर, सर्व घरातील सदस्य हे खुश झाल्याचे दिसले. 'बिग बॉस 18'च्या पहिल्या आठवड्यात,घरातील सदस्यांनी करणवीर मेहरा, गुणरत्न, चाहत अविनाश आणि मुस्कान यांना नॉमिनेट केले गेले होते. काही दिवसांपूर्वी प्राणी संघटना द पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA)नं 'बिग बॉस 18'च्या निर्मात्यांना एक ऑर्डर जारी केली होती. पेटानं निर्मात्यांना गधराज (गाढव) घरातून काढून टाकण्याची विनंती केली होती.