मुंबई :सलमान खानचा धमाकेदार शो 'बिग बॉस 18' लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या शोमधील काही स्पर्धक प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करताना दिसत आहेत. 'बिग बॉस 18' सुरू झाल्यापासून स्पर्धक गुणरत्न सदावर्ते हे सतत चर्चेत आहे. घरात राहून ते अशा गोष्टी बोलतात, ज्याला पाहून सलमान खान देखील हसू आवरू शकत नाही. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला गुणरत्न सदावर्ते यांना घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
'बिग बॉस 18'मधून गुणरत्न सदावर्ते बाहेर : गुणरत्न सदावर्ते यांना 'बिग बॉस 18'मधून अचानक बाहेर पडावं लागलं. आता त्यांच्या बाहेर पडण्याचं कारण त्यांची वादग्रस्त विधानं नसून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली जुनी केस आहेत. सदावर्ते यांच्याशी संबंधित ही माहिती 'बिग बॉस 18'च्या फॅनपेज 'बिग बॉस तक'नं दिली आहे. सदावर्ते यांच्याबद्दल, 'एक्स' अकाउंटवर लिहिलं आहे की, 'गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या केसमुळे बाहेर काढण्यात आले आहे. परंतु ते नंतर शोचा भाग बनू शकतात.' एका रिपोर्टनुसार, गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात अपील केलं होती. याप्रकरणी ते 'बिग बॉस'च्या घराबाहेर आले आहेत. मराठा आरक्षण केसमुळे सदावर्ते हे काही दिवसांपासून खूप चर्चेत होते.