मुंबई :सलमान खानचा रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' सुरू होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. हा शो अनेकांना आवडत आहे, तर काही लोकांना हा सीझन खूपच कंटाळवाणा वाटत आहे. 3 आठवड्यांपासून घरात एकच मुद्दा चालू आहे, तो म्हणजे राशनबद्दल. सुरुवातीपासूनच कुटुंबातील सदस्य फक्त खाण्यावरून एकमेकांशी शोमध्ये भांडताना दिसत आहेत. याशिवाय शोमध्ये असे काही चेहरे आहेत, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. दरम्यान 'बिग बॉस 18'मध्ये सतत टॉप 5 मध्ये काही स्पर्धक असतात. आता यावेळी अविनाश मिश्रा टॉप 5 मधून बाहेर पडला आहे. दरम्यान रजत दलाल घरात पहिल्या क्रमांकावर आहे.
कोण झालं बेघर :रजत दलालनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि सलग तिसऱ्यांदा टॉप 1 रँकिंग मिळवले आहे. या आठवड्यातही रजत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दरम्यान 'बिग बॉस 18'चा वीकेंड का वार शनिवार आणि रविवारी सलमाननं पुन्हा एकदा घरातील स्पर्धकांची क्लॉस घेतील. यावेळी 'भाईजान'नं अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा चांगलचं फटकारलं आहे. याशिवाय सलमान खाननं रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुनचं कौतुक केलंय. 'बिग बॉस 18'च्या घरातून यावेळी दोन स्पर्धक बेदखलही झाले आहेत. मुस्कान बामनेनंतर नायरा बॅनर्जी देखील बेघर झाली आहे. यासोबतच सलमान खान, अजय देवगणची जोडी वीकेंड का वारमध्ये मस्ती करताना दिसली.