मुंबई - Bigg Boss 18 : गेल्या काही काळापासून 'बिग बॉस'चा स्पर्धक अविनाश मिश्रा घरात सुरू असलेल्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. यापूर्वी त्याला चुम दरंग, आफरीन खान आणि करणवीर मेहराबरोबर गैरवर्तन केल्यामुळं बिग बॉसनं घोषणा करून घरातून जाण्यास सांगितलं होतं. मात्र यानंतर अविनाशला बिग बॉसनं घरातून नव्हे तर त्याला जेलमध्ये टाकलं, हा एक शोचा ट्विस्ट होता. याशिवाय त्याला घरातील राशनबद्दलची जबाबदारी देखील दिली. यानंतर घरातील सदस्यांनी उपोषण केलं आहे. आता अविनाश घरात झालेल्या वादाचा बदला घेत असल्याचा दिसत आहे.
अविनाश मिश्रानं केलं घरातील सदस्यांचं राशन बंद : अविनाशनं घरातील सदस्यांचे राशन बंद केलं आहे. तो राशन पुन्हा सुरू करण्यासाठी घरातील सदस्यांसमोर काही अटी ठेवतो, तो त्या स्पर्धकांना नॅशनल टेलिव्हिजनवर सॉरी म्हणायला सांगतो, ज्यांनी त्याच्याबरोबर वाद करत असताना अपशब्द वापरले. या स्पर्धकांमध्ये करणवीर मेहरा, चुम दरंग, आफरीन खान यांची नावे आघाडीवर होती. अविनाश म्हणतो की, जोपर्यंत कुटुंबीय माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना राशन देणार नाही.
एका रात्रीसाठी राशन देण्यासाठी अविनाश तयार : यानंतर करणवीर आणि आफरीन यांना घरातील सदस्य अविनाशला माफी मागायला लावतात. यानंतर ते माफी मागणार नसल्याचे म्हणतात, यावर अविनाश घरातील सदस्यांचं राशन बंद करतो. यानंतर अविनाशची जिवलग मैत्रिण, एलिस कौशिक त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगते, मात्र यावर अविनाश आपल्या गोष्टीवर ठाम राहतो. यानंतर या गोष्टीचा राग रजत दलाल येतो आणि तो अविनाशचे सर्व सामान घराबाहेर फेकून देतो. यानंतर घरात मोठा वाद सुरू होतो. याशिवाय आणखी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अविनाश घरातील सदस्यांना एका रात्रीसाठी राशन देण्यासाठी तयार होत असून करणवीरच्या नावाचा उल्लेख करतो. अविनाशचा अलीकडेच चुम दरंग, आफरीन खान, करणवीर मेहरा आणि बाकी घरातील सदस्यांबरोबर वाद झाला होता. यानंतर तो नाराज असल्याचा दिसत आहे आणि तो मुद्दाम घरातील सदस्यांना त्रास देत आहे.
हेही वाचा :
- अविनाश मिश्राच्या बेघर होण्याच्या घोषणेनंतर ईशा सिंहच्या डोळ्यात अश्रू, विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्या होईल बाचाबाची
- बिग बॉसमध्ये 'पुन्हा येईन', गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' गर्जना !!
- गुणरत्न सदावर्ते यांची केली बिग बॉससह चाहत्यांनी आठवण, घरातील 10 स्पर्धक झाले नॉमिनेट...