मुंबई - 'बिग बॉस' शोच्या नव्या सीझनबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या शोची थीम काय असेल, घर कसं दिसेल, कोण कोण सेलेब्रिटी प्रवेश करतील अशा अनेक बाबतीत लोकांची उत्सुकता वाढत चालली आहे. 'बिग बॉस 18' च्या आगामी सीझनबद्दल उत्साह स्पष्ट दिसत आहे. करिश्माई सुपरस्टार सलमान खान होस्ट म्हणून परत येत असल्यानं, विशेषत: त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या अलीकडील टीझरनंतर हवा तापायला सुरूवात झाली आहे.
'बिग बॉस 18' ची थीम
'बिग बॉस 18' हा नवा सीझन 6 ऑक्टोबर रोजी लॉन्च होणार आहे. यंदाच्या या शोची 'टाईम का तांडव' अशी थीम असणार आहे. या सीझनमध्ये भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील संकल्पनांचा शोध घेण्याचं वचन निर्मात्यांनी दिलं आहे. यंदाच्या 'टाईम का तांडव' या थीमनुसार शोचा सेट डिझाईन करण्यात येणार आहे. यावर्षी 'बिग बॉस 18' तील घर प्राचीन काळापासून प्रेरणा घेणार, लेणी आणि किल्ल्यांचे स्मरण करून देणारे घटक असलेलं, मोठ्या आणि कलाकुसर असलेल्या शिल्पांनी सुशोभित केलेलं असेल.
रहस्यांनी भरलेले असेल बिग बॉसचं घर
या वर्षीचे घर केवळ आलिशान नसून अधिक नक्षिदार डिझाइन केलेलं आहे आणि ते अनेक आश्चर्यानी भरलेले आहे. यात गुप्त प्रवेशद्वार, लपलेले दरवाजे आणि चतुराईने लावलेले कॅमेरे आहेत ज्यांच्याकडे कोणाचेही सहसा लक्ष जाणार नाही. बागेच्या परिसरात प्रवेश केल्यावर, एखाद्याचे स्वागत उंच खांबांनी केलं जाईल. बाथरुमचा परिसर तुर्की हम्मामपासून प्रेरणा घेणारा असेल.
45 दिवस, 200 कामगारांच्या कष्टातून उभारला आहे एक जबरदस्त सेट
'बिग बॉस'च्या या या वैभवशाली निवासस्थानाची निर्मिती ही काही लहान सहान गोष्ट नव्हती. याची अंमलबजावणी करण्यासाठी 200 कामगारांना सलग 45 दिवस काम करावं लागलं. कला दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी भारतीय सौंदर्यशास्त्राचा योग्य वापर यासाठी केला आहे. हा सेट उभा करत असताना कला दिग्दर्शकानं दिलेल्या बजेटचा विचार न करता थीमनुसार सेट कसा योग्य करता येईल यावर भर दिल्यानं बजेट बाहेर जाऊन यासाठी खर्च करावा लागला आहे.
'बिग बॉस'च्या या 18 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण सेलेब्रिटी सहभागी होतील याची पूर्ण पुष्ठी झालेली नाही. मात्र, या सीझनमध्ये निर्मात्यांनी आत्तापर्यंत शहजादा धामी, विवियन डिसेना, चाहत पांडे आणि शिल्पा शिरोडकर हे सेलेब्रिटी बिग बॉसमध्ये सामील होतील याची खात्री दिली आहे.
बिग बॉस 18 स्पर्धकांची संभाव्य यादी पुढील प्रमाणे :
निया शर्मा
हेमलता शर्मा
न्यारा बॅनर्जी
मुस्कान बामणे