महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीचा फर्स्ट लूक झाला व्हायरल - बिग बॉस 17 ट्रॉफी फर्स्ट लूक

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'ची ट्रॉफी ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान हा शो कोण जिंकेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना आहे.

Bigg Boss 17
बिग बॉस 17

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 4:19 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या फिनालेसाठी प्रेक्षकांना 3 महिन्यांहून अधिक काळ वाट पाहावी लागली आहे. दरम्यान 28 जानेवारी रोजी या शोचा ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. अलीकडेच, टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याला घरातून बाहेर काढण्यात आले. आता टॉप 5 स्पर्धकांचे चेहरे समोर आले आहेत. 'बिग बॉस 17'च्या फिनाले हा 6 तासचा होणार आहे. दरम्यान 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ही ट्रॉफी खूप वेगळी असून याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. 'बिग बॉस 17'चे निर्माते विजेत्याला चमकदार ट्रॉफी देणार आहेत.

टॉप 5 स्पर्धक कोण आहेत : प्रत्येक सीझनप्रमाणेच 'बिग बॉस 17'च्या घरातही भांडण, प्रेम हे सर्व पाहायला मिळलं आहे. या शोमध्ये मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा स्पर्धक आहेत. हे स्पर्धक टॉप 5 मधून असून आता या शोला जिंकण्यासाठी सर्व खूप प्रयत्न करताना दिसत आहेत. या स्पर्धांकाचे मित्र मंडळी त्यांना पाठिंबा देताना सध्या दिसत आहेत.आता काही प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहेत. या प्रोमध्ये घरातील काही सुंदर क्षण या स्पर्धकांचे दाखविण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मन्नारा चोप्राला अभिनेत्री प्रियांका चोप्रा पाठिंबा देताना दिसली होती. तिनं मन्नाराचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

शोचा विजेता कोण असेल :याशिवाय विकी जैननं देखील अंकिताला पाठिंबा देत एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यानं पत्नी अंकिताला वोट करण्याचं आव्हान जनतेला केलं होतं. मुनावर, अंकिता आणि मन्नारा यांना सोशल मीडियावर सर्वाधिक प्रेम मिळवत आहेत. हे तीन स्पर्धक टॉप 3 च्या शर्यतीत दिसणार असा अंदाज अनेकजण लावत आहेत. दरम्यान अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर हा सामना मन्नारा आणि मुनावर यांच्यात होऊ शकतो असं अनेकजण म्हणत आहेत. मुनावरची फॅन फॉलोईंग मन्नारापेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे तो हा शो जिंकून 'बिग बॉस 17 ची ट्रॉफी घरी नेऊ शकतो', असं अनेकजण म्हणत आहेत.

हेही वाचा :

  1. मौनी रॉय आणि सूरज नांबियारनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्यानिमित्त शेअर केला सुंदर फोटो
  2. ओटीटीवर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर झाले 'हे' चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित
  3. बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होईल, जाणून घ्या तारीख

ABOUT THE AUTHOR

...view details