महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बिग बॉस 17 च्या फिनालेचे काउंटडाऊन सुरू, आज लागणार निकाल; पाहा कोण आहेत 'टॉप 5' मध्ये - बिग बॉस 17 चा निकाल

Bigg Boss Today Result : सलमान खान होस्ट केलेला शो 'बिग बॉस 17' ची ट्रॉफी कोण जिंकणार हे आज चाहत्यांना समजणार आहे. मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे आणि अभिषेक कुमार यांच्यापैकी कोण बिग बॉस 17 ची ट्रॉफी घरी घेऊन जाईल, हे आज निश्चित होणार आहे.

Bigg Boss Today Result
बिग बॉस 17 चा आज निकाल

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 8:52 AM IST

हैदराबाद : Bigg Boss Today Result : आज रविवार 28 जानेवारी रोजी टेलिव्हिजन रिॲलिटी शो बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले होणार आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्पर्धकाला शुभेच्छा देण्याला सुरूवात केली आहे. या शोमध्ये मनारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण मशेट्टी आणि अंकिता लोखंडे हे टॉप 5 आहेत. गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमामध्ये कोण विजेता ठरणार? याची चर्चा सुरू आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजय मिळवून देण्यासाठी चाहते मोठ्या उत्साहानं ऑनलाईन मतदान करत आहेत.

अनेकांचा मुनव्वर फारुकीला पाठिंबा : हे स्पर्धक टॉप 3 मध्ये : सोशल मीडियावर आपलाच स्पर्धक विजेता व्हावा, यासाठी अनेक चाहते सोशल मीडियात सक्रिय झाले आहेत. मुनव्वर फारुकी, मनारा आणि अभिषेक कुमार यांची नावे टॉप 3 मध्ये सामील झाली आहेत. बिग बॉस 17 चा ग्रँड फिनालेचा प्रोमोदेखील समोर आला आहे. यामध्ये फिनाले एपिसोडची काही झलक दाखवण्यात आली आहे. रविवारच्या एपिसोडमध्ये पूजा भट्ट, करण कुंद्रा आणि अंकिता लोखंडे यांचे काही क्षण दाखवण्यात आले. बिग बॉसचे काही माजी स्पर्धक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये पोहोचणार आहेत. मुनव्वर फारुकीला पाठिंबा देण्यासाठी करण कुंद्रा आला आहे. या ग्रँड फिनालेमध्ये तो मुनव्वरला सपोर्ट करताना दिसेल.

  • बक्षिसाची रक्कम किती लाख असेल? : बिग बॉसच्या विजेत्याला ट्रॉफीसह बक्षीस रक्कमही मिळते. या हंगामात 30 ते 40 लाख रुपयांची रोख रक्कम मिळणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय विजेत्याला कारही मिळते.
  • या पाच जणांमध्ये स्पर्धा : बिग बॉसचे टॉप 5 स्पर्धक म्हणजे अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी. आज 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
  • स्पर्धकांचा कार्यक्रम : नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, अंकिता लोखंडे-विकी जैन, ईशा मालवीय-समर्थ जुरेल हे कपल डान्स करणार आहेत. तसंच, अभिषेकचा सोलो परफॉर्मन्स असेल. त्यांचे प्रोमो रिलीज झाले आहेत. तसंच, भारती सिंग, हर्ष लिंबाचिया प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय टीव्ही आणि बॉलीवूडमधील इतर सेलिब्रिटीदेखील या शोचा भाग असू शकतात.

हेही वाचा :

ABOUT THE AUTHOR

...view details