मुंबई - Eijaz Khan :टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस'च्या घरात अनेक नाती तयार झाली आणि यातील काही नातीच लग्नाच्या शेवटापर्यंत पोहोचली आहेत. 'बिग बॉस 14' मध्ये एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांची प्रेमकहाणीही सुरू झाली होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही एजाज खान आणि पवित्रा पुनिया त्यांच्यामधील नात आणखी घट्ट झालं होतं. दोघेही त्याच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. दरम्यान, नुकतीच दोघांच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली आहे.
4 वर्षे डेटिंग केल्यानंतर एजाज-पवित्राचं नातं तुटलं : पवित्रा पुनिया आणि एजाज खान 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, त्यांचा साखरपुडाही झाला होता. पण दुर्दैवानं त्यांचं नातं फार काळ टिकू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले आहेत. दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आहे. अलीकडेच एका वेबपोर्टलशी बोलताना पवित्रानं सांगितलं की, ''माझं आणि एजाज 5 महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं आहे, आम्ही एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होतो.'' गेल्या महिन्यात एजाजनं मालाडमधील हे अपार्टमेंट सोडले आणि आता पवित्रा तेथे एकटीच राहत आहे. पवित्रा पुनिया पुढं सांगितलं की, 'आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, प्रत्येक गोष्टीची शेल्फ लाइफ असते. नातेसंबंधातही असं होत असते. मी त्याचा खूप आदर करते, पण आमचे नाते टिकू शकले नाही.''