मुंबई - Bhool Bhulaiyaa 3 First Poster out: 'भूल भुलैया 3' हा चित्रपट दिवाळीला रिलीज होणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटाचं नवीन टीझर पोस्टर रिलीज करण्यात आलय. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये एका भीतीदायक दरवाजावर एक कुलूप आहे, ज्यावर तंत्र-मंत्राचे धागे बांधलेले आहेत. हाच दरवाजा 'भूल भुलैया'आणि 'भूल भुलैया 2' मध्ये दिसला आहे. 'भूल भुलैया' फ्रेंचाइजीतील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची घोषणा देखील करण्यात आली आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3'च्या पोस्टरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव देखील देण्यात आलं आहे.
कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार : थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होईल. 'भूल भुलैया 3'चा स्ट्रीमिंग पार्टनर नेटफ्लिक्स असल्याचं पोस्टरवर दिसत आहे. अभिनेता कार्तिक आर्यननं बुधवारी 25 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर त्याच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटामधील पहिलं पोस्टर रिलीज केलय. व्हायरल झालेल्या या पोस्टरवरून हे स्पष्टपणे दिसत आहे की, पुन्हा एकदा मंजुलिकाची सावली कुटुंबातील सदस्यांवर पडेल. यानंतर कार्तिक आर्यन जो रूह बाबा बनला आहे, तिच्याबरोबर लढताना दिसेल. दरम्यान या पोस्टवर कार्तिकनं लिहिलं, 'दार उघडेल…या दिवाळीत, 'भूल भुलैया 3'. दरम्यान बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3'ची 'सिंघम अगेन'बरोबर टक्कर होईल.