महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या जोडप्यानं मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली सुंदर पोस्ट - Bharti Singh sons birthday - BHARTI SINGH SONS BIRTHDAY

Bharti Singh Son Birthday: भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा लक्ष्य उर्फ गोलाचा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी या जोडप्यानं एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Bharti Singh Sons Birthday
भारती सिंगच्या मुलाचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Bharti Singh Son Birthday: कॉमेडी क्वीन भारती सिंग नेहमीच तिच्या चाहत्यांना हसवत असते. ती कॉमेडीबरोबर अनेक रिअ‍ॅलिटी शोचं सुत्रसंचालन करताना दिसते. याशिवाय आता ती व्लॉगरही बनली आहे. दरम्यान, कॉमेडी क्वीननं 2 वर्षांपूर्वी आपल्या गोड मुलाला म्हणजेच लक्ष्य उर्फ गोलाला जन्म दिला होता. आज 3 एप्रिल रोजी भारतीचा मुलगा गोला हा 2 वर्षांचा झाला आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियानं मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. भारतीनं गोलाचा सुंदर फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''माझ्या घरी राम आले आहेत, हॅपी बर्थडे गोले.'' यावर तिनं सुंदर इमोजी देखील जोडले आहेत. भारतीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करू गोलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हर्ष लिंबाचियानं शेअर केली पोस्ट :याशिवाय दुसरीकडे हर्षनं एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ''गोलाला सर्वजण हॅपी बर्थडे म्हणा.'' भारती अनेकदा आपल्या मुलाबरोबर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. भारतीनं शेअर केले व्हिडिओ अनेकांना खूप आवडतात, कारण त्यात ती गोला मस्ती करताना अनेकदा दिसते. याशिवाय गोलाचं बोलणं देखील अनेकांना आवडते. शहनाज गिलला गोला खूप आवडतो. तिनं गोलाला वाढदिवसापूर्वी भेटवस्तू पाठवली होती, त्यात कारचा समावेश होता. भारतीनं तिच्या व्लॉगमध्ये शहनाजच्या भेटीची झलकही शेअर केली होती.

भारती सिंगनं केला खुलासा :दरम्यान 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे. या शोमध्ये 'बुवा' भारती सिंग दिसली नाही. यानंतर सोशल मीडियावर भारतीबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. यानंतर भारतीनं एका संवादादरम्यान सांगितलं की, ''कपिलच्या शोमध्ये सहभागी होण्याचा तिचा विचार नाही. जर मला फोन आला तर मी नक्की जाईन. मी सध्या माझे प्रोजेक्टस्, पॉडकास्ट आणि 'डान्स दिवाने'च्या शूटिंग करत आहे.'' भारती सिंगनं कपिल शर्मा शोच्या सर्व सीझनमध्ये 'बुवा'ची भूमिका साकारली होती. तिची हे पात्र अनेकांना आवडले होते. आता खरच भारती 'द ग्रेट इंडियन कपिल शो' एंट्री करू शकेल , हे काही दिवसानंतर कळेल.

हेही वाचा :

  1. केएल राहुल आणि अथिया शेट्टी खरोखरच होणार का पालक? सत्य आलं बाहेर... - ATHIYA SHETTY AND KL RAHUL
  2. 'किल'चा टीझर लवकरच होणार प्रदर्शित; करण जोहरनं शेअर केली पोस्ट - kill teaser out soon
  3. सोनाक्षी सिन्हाच्या नखरेल अदांनी सजलेलं 'हीरामंडी'तील 'तिलस्मी बहीन' गाणं लॉन्च - Heeramandi Song launch

ABOUT THE AUTHOR

...view details