महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

‘भक्षक’चा ट्रेलर रिलीज, तडफदार पत्रकाराच्या भूमिकेत भूमी पेडणेकरचा नवा अवतार - भक्षक ट्रेलर

Bhakshak Trailer Out : भूमी पेडणेकरच्या आगामी ‘भक्षक’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये भूमी पेडणेकर तडफदार पत्रकाराची भूमिका साकारत आहे. ज्वलंतशील विषयावरील चित्रपटाचा ट्रेलर खिळवून ठेवणार आहे.

Bhakshak Trailer Out
भक्षकचा ट्रेलर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 2:01 PM IST

मुंबई - Bhakshak Trailer Out : भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेल्या 'भक्षक' चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. अतिशय ज्वलनशील विषयावरील संघर्षाची कहाणी यामध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये भूमी पेडणेकरने एक भयानक गुन्हा उघडकीस आणायचा प्रयत्न करणाऱ्या आणि महिलांवरील गुन्ह्यांचे वास्तव समोर आणणाऱ्या वैशाली सिंग या शोध पत्रकाराची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट 9 फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. पुलकित दिग्दर्शित या चित्रपटात भूमी पेडणेकर, संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूमी 'भक्षक'मध्ये एका मुलींच्या निवारागृहातील बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास करताना दिसणार आहे.

ट्रेलरची सुरुवात एका अनाथ आश्रमातील मुलींनी भरलेल्या खोलीच्या दृष्याने होते. संजय मिश्रा भूमी पेडणेकरला मुलींवर झालेल्या अन्यायाची माहिती दोताना दिसतो आणि ती त्यांच्याबद्दल माहिती गोळा करू लागते. यावरून तिला कळले की, या षडयंत्रात मंत्री गुंतलेले आहेत आणि असंख्य उच्चस्तरीय राजकारणी देखील आहेत. भूमी पेडणेकर वस्तुस्थिती कशी शोधते आणि ती व्यक्ती पकडू शकते की नाही हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना पुलकित म्हणाला: " या चित्रपटाच्या निर्मितीमागे आमचा उद्देश समाजातील कठोर वास्तवांवर प्रकाश टाकणे आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणणारे संभाषण सुरू करणे हा होता. मी या महत्त्वपूर्ण संवादात आणखी लोक सहभागी होण्याची प्रतीक्षा करत आहे."

भूमीनेही चित्रपटाच्या कठीण विषयावर आपले विचार मांडले. ती म्हणाली: "भक्षक चित्रपटावर काम करणे अवघड होते कारण हा एका संवेदनशील आणि वादग्रस्त विषयावर आधारित आहे. हा चित्रपट गंभीर प्रश्न उपस्थित करतो जे निःसंशयपणे एखाद्याच्या विवेकाला हादरवून सोडतील. मला आशा आहे की, हा चित्रपट चर्चेला प्रोत्साहन देईल. यामुळे वास्तव बदलण्यासाठी याचा उपयोग होईल."

भूमीने नुकतेच सांगितले होते की, तिने 'दम लगा के हैशा' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केल्यापासून तिला प्रचंड यश मिळाले आहे आणि तिला 'भक्षक'डूनही अशीच अपेक्षा आहे. या चित्रपटात ती एका प्रखर, लढाऊ पत्रकाराच्या भूमिकेत आणि याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. शिवाय, ती रकुल प्रीत सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यासोबत अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटात स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. मलायका अरोरा आणि करीना कपूरनं अमृता अरोराला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
  2. तृप्ती डिमरीच्या बर्थडे पोस्टने सॅम मर्चंटसोबत डेटिंगच्या अफवांना पुन्हा उजाळा
  3. धर्मेंद्रसोबतच्या किंसिंग सीनमुळे तब्बूनं उडवली शबाना आझमीची खिल्ली

ABOUT THE AUTHOR

...view details