महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

व्हॅलेंटाईनच्या आधी 'मेरे ख्वाबों में जो आये' गाण्यावर शहनाझ गिलचा कुशा कपिलासोबत डान्स

शहनाझ गिल आणि कुशा कपिला यांनी व्हॅलेंटाईनच्या काही दिवस आधी एक धमाल रील बनवले आहे. यातून त्या आपल्या नव्या जोडीदाराचा शोध घेतानाचा अभिनय करताना दिसतात. या दोघींनी यापूर्वी 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.

Shehnaaz Gill and Kusha Kapila
शहनाझ गिल आणि कुशा कपिला

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 9:55 AM IST

मुंबई - शहनाझ गिल आणि तिची बेस्ट फ्रेंड कुशा कपिलासोबत हॉटेलमध्ये असताना काय करु शकते? याचा अंदाज तुम्ही लावू शकता. अर्थातच दोघींनी मिळून एका रीलचे शूटिंग केले आणि धमाल गाण्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 'मेरे ख्वाबों में जो आये' या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील गाण्यावर दोघींना भरपूर एनर्जटिक डान्स परफॉर्मन्स केला आहे.

14 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या आगामी व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अविवाहित असलेल्या या दोन मैत्रीणींनी हे रील अगदी मनापासून बनवले आहे. व्हॅलेंटाईनच्या आधी जोडीदाराच्या शोधात असलेल्या या दोघी गाण्यातील रोमँटिक बोलवर अभिनय करताना दिसतात. कुशाला टॅग करत तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करताना शहनाजने व्हिडिओ "सब ठीक हो जायेगा बहेन" असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओमध्ये, कुशा आणि शहनाझ 'मेरे ख्वाबों में जो आये' या गाण्याच्या ट्यूनवर लिप सिंक करताना दिसत आहेत आणि त्यांचे परफेक्ट मॅच शोधण्यासाठी ड्रामा करताना दिसत आहेत. काळ्या रंगाच्या त्यांच्या हिवाळ्यातील पोशाखात दोघेही सुंदर दिसत होत्या. शहनाझने काळ्या हाय-नेकवर चिक ब्लॅक चेकर्ड स्कर्ट घातला आणि पूर्ण काळ्या ओव्हरकोटसह तिचा लूक पूर्ण केला. दुसरीकडे, कुशाने या गाण्यासाठी निळा डेनिम आणि काळा शर्ट निवडला आणि तिचे केस मोकळे ठेवले आहेत.

या दोघी मैत्रीणी करण बुलानीच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. त्यांच्याशिवाय या चित्रपटात भूमी पेडणेकर, शिबानी बेदी आणि डॉली सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट पाच मैत्रिणी आणि महिलांच्या लैंगिक समाधानाच्या संकल्पनेशी त्यांची भेट घडवून आणणारा होता.

06 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये सुरू झालेल्या 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटामध्ये सुशांत दिवगीकर, करण कुंद्रा आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत. यात स्त्री सहवास, अविवाहित महिला, प्रेम आणि आनंदाचा शोध या विषयांचा शोध घेण्यात आला आहे. या वर्षी टीफ ( TIFF ) मध्ये गाला वर्ल्ड प्रीमियरला दिलेला हा नायिका प्रधान चित्रपट एकमेव वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट होता.

कामाच्या आघाडीवर, शहनाझ गिल आगामी चित्रपट 'सब फर्स्ट क्लास' चित्रपटामध्ये अभिनेता वरुण शर्मासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बलविंदर सिंग जंजुआ करत आहेत आणि मुराद खेतानी यांनी याची निर्मित केली आहे.

हेही वाचा -

  1. संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचं आयोजन कधी? पंतप्रधान मोदींनाही मिळालयं नामांकन
  2. प्रेक्षकांच मनोरंजन करताना कॅन्सरशी दिला लढा, सोनाली बेंद्रे ते किरण खेर 'या' सेलिब्रिटींनी दाखविली हिंमत
  3. कर्करोगाविरोधात लढा देणाऱ्या पत्नीकरिता आयुष्मान खुरानानं पोस्ट केली शेअर, संघर्ष केल्यानं केलं कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details