महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बडे मियाँ छोटे मियाँ' जगभरात पाचव्या दिवशी करणार 100 कोटींचा टप्पा पार - bade miyan chote miyan - BADE MIYAN CHOTE MIYAN

Bade Miyan Chote Miyan 100cr : 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट जगभरात आज पाचव्या दिवशी 100 कोटीचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दलचे आकडे शेअर केले आहेत.

Bade Miyan Chote Miyan 100cr
बडे मियाँ छोटे मियाँ 100 कोटी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 2:53 PM IST

मुंबई - Bade Miyan Chote Miyan 100cr : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 11 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटानं चार दिवस रुपेरी पडद्यावर शानदार कामगिरी केली आहे. चित्रपटाच्या चार दिवसांचा पहिला वीकेंड उत्कृष्ट राहिला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटीचा आकडा सहज पार करणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप झपाट्यानं कमाई करत आहे. या चित्रपटानं पहिला सोमवारी रिलीजच्या पाचव्या दिवसात प्रवेश केला आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ'ची कमाई:या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चार दिवसांमधील एकूण कमाईचे आकडे शेअर केले गेले आहेत. आता हा चित्रपट रिलीजच्या पाचव्या दिवशी किती कमाई करेल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'नं 36.33 कोटी रुपयांसह जगभरात आपले खाते उघडले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी 55.14 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 76.01 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी एकूण 96.18 कोटी रुपयांची कमाई झाली होती.

'बडे मियाँ छोटे मियाँ' स्टारकास्ट : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, मानुषी, चिल्लर, आलिया इब्राहिम, साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अली अब्बास जफर, जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी निर्मित केला आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट पूजा एंटरटेनमेंट बॅनरखाली बनविण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा अक्षय आणि टायगर एकत्र दिसले आहेत. आता या चित्रपटाकडून अक्षय आणि टायगरला खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी टायगरचा 'गणपथ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. तसेच दुसरीकडे अक्षयच्या 'मिशन राणीगंज' देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी करू शकला नाही. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट 350 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूरनं राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरमधील फोटो केले शेअर , पाहा फोटो - janhvi kapoor share pics
  2. जेलमधून सुटल्यानंतर 22 दिवसांनी एल्विश यादवनं खरेदी केली करोडोंची आलिशान कार, पाहा व्हिडिओ - Elvish Yadav
  3. ईडन गार्डन्सवर दिसली किंग खान शाहरुखची जादू! अबराम, सुहाना आणि अनन्या पांडेसह साजरा केला केकेआरचा विजय - Shah Rukh Khan

ABOUT THE AUTHOR

...view details