महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'च्या समोर 'बेबी जॉन'ची झाली हवा, वीकेंडला किती केली कमाई जाणून घ्या... - BOX OFFICE

'पुष्पा 2' आणि 'बेबी जॉन' सध्या रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान वरुण धवन स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या संघर्ष करताना दिसत आहे.

BOX OFFICE COLLECTION
बॉक्स ऑफिस कलेक्शन ('बेबी जॉन'- 'पुष्पा 2' (पोस्टर))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 30, 2024, 9:54 AM IST

मुंबई :अभिनेता वरुण धवनचा ॲक्शन फॅमिली ड्रामा 'बेबी जॉन' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'बेबी जॉन'ची स्पर्धा अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' आणि शाहरुख खानचा डबिंग चित्रपट 'मुफासा'शी आहे. ॲटली आणि कॅलिसचा ॲक्शन चित्रपट 5 दिवसांच्या वाढीव वीकेंडनंतरही बॉक्स ऑफिसवर 30 कोटी कमाई करू शकलेला नाही. वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी अभिनीत 'बेबी जॉन' सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट साऊथ चित्रपट 'थेरी'चा हा अधिकृत रिमेक आहे, जो प्रचंड यशस्वी झाला होता. 'बेबी जॉन'च्या जोरदार प्रमोशननंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करू शकलेला नाही.

'बेबी जॉन' चित्रपटाची कमाई :'बेबी जॉन' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर 30 कोटींचा आकडा पार करण्यासाठी कठोर संघर्ष करत आहे. सॅकनिल्क रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर पहिल्या रविवारी म्हणजेच 5व्या दिवशी या चित्रपटानं सुमारे 4.75 कोटी रुपयांची कमाई केली. देशांतर्गत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 28.65 कोटी रुपये झालंय. 25 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या 'बेबी जॉन'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 11.25 कोटी रुपयांचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तसेच रिलीजच्या पहिल्या शुक्रवारी या चित्रपटानं 3.65 कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला.

'पुष्पा 2'ची कमाई : 'पुष्पा 2'नं रिलीजच्या 25 व्या दिवशी सर्व भाषांमध्ये 16 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार व्यवसाय करत आहे. या चित्रपटाची देशांतर्गत कमाई 1157.35 कोटी रुपयांची झाली आहे. याशिवाय हिंदीमध्ये 'पुष्पा 2'नं 740.25ची कमाई करून एक इतिहास रचला आहे. हा चित्रपट अनेकांना पसंत येत आहे, त्यामुळे चाहते 'पुष्पा 2' पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये आता देखील गर्दी करताना दिसत आहेत. याशिवाय 'पुष्पा 2'नं जगभरात 1700 कोटीहून अधिकची कमाई केली आहे.

हेही वाचा :

  1. 'बेबी जॉन' बॉक्स ऑफिसवर आपटला, 'पुष्पा 2'नं चारली धूळ, तिसऱ्या दिवशीचे आकडे चकित करणारे
  2. 'बेबी जॉन' चित्रपटातील स्टारकास्टची 'फी' घ्या जाणून, 'भाईजान'नं किती केला चार्ज ?
  3. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, जाणून घ्या आकडा...

ABOUT THE AUTHOR

...view details