महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बाबू' चित्रपटातील धमाकेदार गाणे 25 फुटाच्या भव्य कटआऊट पोस्टरसह पुण्यात लॉन्च - BABU MOVIE SONG LAUNCHED - BABU MOVIE SONG LAUNCHED

BABU MOVIE SONG LAUNCHED : हँडसम आणि डॅशिंग हिंदी अभिनेता अंकित मोहन 'बाबू' या मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याने यापूर्वी ‘फतेहशिकस्त’ सारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याच्या बाबू या आगामी चित्रपटातील गाणं जोरदारपणे लॉन्च झालं आहे.

BABU MOVIE SONG LAUNCHED
'बाबू' (BABU poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 5:39 PM IST

मुंबई - 'बाबू' या मराठी चित्रपटाचा ग्रँड इव्हेन्ट पुण्यात उत्साहात पार पडला. हा धमाकेदार अ‍ॅक्शन चित्रपट येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'बाबू' चित्रपटातील गाण्याचा लॉन्चिंग कार्यक्रम पुण्याच्या राहुल टॉकीजच्या आवारात आयोजित केला होता. यावेळी 25 फुटाचे भव्य कटआऊट पोस्टर लावण्यात आले होते. या चित्रपटात बाबूची भूमिका अभिनेता अंकित मोहन साकारत आहे. त्याची प्रतिमा असलेल्या या भव्य कटआऊटसमोर गाण्याचं लॉन्चिंग करण्यात आलं.

'बाबू' चित्रपटातील गाण्यावर चित्रपटाचा नायक अंकित मोहन आणि अभिनेत्री रुचिरा जाधव यांनी जोरदार डान्स केला. या खास कोरिओग्राफ केलेल्या गाण्याच्या ठेक्यावर उपस्थितांनीही ठेका धरला होता. अतिशय उत्साहामध्ये कटआऊटवरील पडदा दूर करण्यात आला.

बाबू मोशन पोस्टर

अलिकडेच ‘बाबू’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. चित्रपटाच्या पोस्टरमधील खळखळणाऱ्या समुद्रात डौलात उभ्या असलेल्या बोटीमध्ये रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असलेल्या तरुणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा तरुण नक्की कोण आहे असा प्रश्न रसिकांना पोस्टर पाहून पडला होता. आता मात्र प्रेक्षकांची उत्सुकता फार न खेचता या तरुणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीत आघाडीवर असलेला हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अंकित मोहन 'बाबू' या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये अतिशय हुल्लडबाजी अंदाजात दिसणारा अंकित भाव खाऊन जात आहे. अंकितच्या या लूकने अभिनेत्याबद्दल असलेली प्रेक्षकांची उत्सुकता तर कमी केली, मात्र त्याचा हा लुक पाहून आता सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अंकित हा मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. त्याने यापूर्वी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या ‘फतेहशिकस्त’ सारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय अंकित हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details