महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीनं केला अथिया आणि जावई केएल राहुलवर प्रेमाचा वर्षाव - KL Rahul

Athiya Shetty-KL Rahul On1st Wedding Anniversary : अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांना त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वडील सुनील शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टीनं शुभेच्छा दिल्या आहेत. या विशेष प्रसंगी सुनील शेट्टीनं सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

Athiya Shetty-KL Rahul On1st Wedding Anniversary
अथिया शेट्टी-केएल राहुलचा लग्नाचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 4:44 PM IST

मुंबई Athiya Shetty-KL Rahul On1st Wedding Anniversary : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. लाडकी मुलगी आणि जावई केएल राहुलवर सुनील शेट्टीनं अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अथियाचा भाऊ अहान शेट्टीनं सोशल मीडियावर न पाहिलेला लग्नाचा फोटो शेअर करून तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील शेट्टीनं शेअर केलेल्या पोस्टवर लिहिलं, 'हॅपी फर्स्ट अ‍ॅनिव्हर्सरी मुलांनो.'' सुनील शेट्टीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा लग्नाचा वाढदिवस :याशिवाय अहान शेट्टीनं शेअर केलेल्या पोस्टवर त्यानं लिहिलं, ''वेळ किती लवकर निघून जातो! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.'' या फोटोमध्ये अहान लग्नामधील काही विधी करताना दिसत आहे. अथिया आणि केएल राहुल हे नेहमी त्यांचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे नेहमीच धार्मिक स्थळी जात असतात. याआधी हे जोडपे उज्जैनच्या महाकालेश्वरला गेले होते. याठिकाणचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचं लग्न : यानंतर या जोडप्यानं 2023 रोजी घाटी सुब्रमण्य स्वामी मंदिराला भेट दिली. 2019 मध्ये या कपलनं डेटिंग सुरू केल्यानंतर, यांनी गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये लग्न केलं. दोघांनी मुंबईत लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शनही दिलं. या लग्नाच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. हा लग्नाचा सोहळा खूप भव्य होता. अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचं झालं तर, तिनं 2015 मध्ये आलेल्या 'हीरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ज्यामध्ये ती सूरज पांचोलीसोबत रुपेरी पडद्यावर दिसली होती. यानंतर ती 'मुबारकां' आणि 'मोतीचूर चकनाचूर'मध्येही दिसली होती.

हेही वाचा :

  1. कंगना राणौतनं 'एमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर
  2. चित्रीकरणादरम्यान सैफ अली खानला दुखापत, गुडघा आणि खांद्यावर झाली शस्त्रक्रिया
  3. निर्मात्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ'चं पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या टीझर रिलीजबद्दल केला खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details