महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बीबी करन्सी मिळविण्यात अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर झाले अयशस्वी, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' मधले दररोज दिले जाणारे टास्क, इथले वाद-विवाद चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत. या शोमध्ये बीबी करन्सी मिळविण्यासाठीच्या नव्या टास्कमध्ये अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर अयशस्वी ठरले आहेत.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 18, 2024, 2:18 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये आता प्रत्येक स्पर्धक जोर लावून खेळताना दिसत आहेत. सध्या बीबी करन्सीसाठी घरात टास्क सुरू आहे. गॅस कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी घरातील सदस्यांना बीबी करन्सीची गरज आहे. आतापर्यंत घरात बीबी करन्सी मिळवण्यासाठी तीन फेऱ्या झाल्या आहेत. 'बिग बॉस'नं तयार केलेल्या जोड्यांनुसार तीन फेऱ्या खेळल्या गेल्या आहेत. यात पंढरीनाथ - संग्राम यांनी 20 हजार, धनंजय-वर्षा यांनी 30 हजार आणि अरबाज-जान्हवीनं शून्य करन्सी मिळवली आहे. 'काकाकुवा' या पक्षांच्या टास्कमध्ये अरबाज-जान्हवीच्या जोडीला अपयश मिळालं आहे.

बीबी करन्सीसाठी टास्क : बीबी करन्सी न मिळाल्यानं अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर हे नाराज झाल्याचे दिसले. बीबी करन्सीच्या टास्कदरम्यानचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला अंकिता 'काकाकुवा' टास्कमध्ये सूरजला एक इशारा करून आणि कुठला प्राणी असल्याचं सांगायला लावते. हा टास्क खूप मजेशीर आहे. आजच्या एपिसोडमध्ये अंकिता आणि सूरजची धमाल पाहायला मिळणार आहे. दरम्यान, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत अचूक पक्षी, प्राणी ओळखून किती बीबी करन्सी जिंकेल, हे पाहणं देखील मजेशीर असेल.

प्रोमो झाला व्हायरल : घरातील सर्व सदस्य एकूण किती बीबी करन्सी जिंकणार आणि किती वेळासाठी गॅसचं कनेक्शन मिळवेल, हे देखील महत्त्वाचं असेल. आणखी एक प्रोमो इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला गेला आहे. डीपी दादा उर्फ धनंजय पोवार म्हणतो, ''गॅस सुरू करा.'' यानंतर जान्हवी किल्लेकर म्हणते, ''बिग बॉस आम्ही गॅस सुरू करत आहोत.'' प्रोमोत घरातील सर्व सदस्य मिळून गॅसवर जेवण बनवताना दिसत आहेत. यानंतर निक्कीला वर्षा उसगांवकर विचारतात, ''गरम पाणी?' यावर उत्तर देत निक्की म्हणते, ''केलं होतं गरम पाणी.'' यानंतर वर्षा उसगावकर म्हणतात, ''राईचा पर्वत करायचा उगीच.'' यावर अरबाज पटेल म्हणतो, ''तिथे गरम पाणी फेकलं.'' आता या प्रोमोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

  1. अभिजीत सावंत आणि पंढरीनाथ कांबळेमध्ये रंगली चर्चा, अरबाज पटेलला आहे धोका ? - Bigg Boss Marathi
  2. आर्या जाधवनंतर वैभव चव्हाणला शोमधून 'बिग बॉस'नं दाखवला बाहेरचा रस्ता, नवीन प्रोमो रिलीज - Bigg Boss Marathi
  3. रितेश देशमुख 'भाऊचा धक्का', निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्याबद्दल आर्या जाधवला फटकारलं - riteish deshmukh

ABOUT THE AUTHOR

...view details