मुंबई - Arbaaz Khan and Sshura Khan :अभिनेता अरबाज खाननं गेल्या वर्षी 2023च्या शेवटी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं होतं. लग्नानंतर अरबाज आणि शूरा एकत्र अनेकदा स्पॉट होतात. या जोडप्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा दोघांना काही युजर्स त्याच्या वयातील गॅपबद्दल देखील ट्रोल करत असतात. दरम्यान सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज खान कार चालवत असताना गाणी गाऊन पत्नीचं मनोरंजन करत आहे. शूरा खान पतीच्या गायनाचा मनापासून आनंद घेत आहे.
अरबाज खान आणि शूरा खानचा व्हिडिओ व्हायरल :अरबाज खान शूरा खानसाठी 'यू कॅन जू मॅजिक' हे इंग्रजी गाणे गातोय. हा व्हिडिओ शूरा खाननं तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. शूरानं तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "मॅजिक अरबाज खान नाईट ड्राईव्हज." आता शूराच्या पोस्टवर काही युजर्स कमेंट्स करत आहेत. "एका युजरनं या पोस्टवर लिहिलं, "चांगल्या व्यक्तीला काय बनवलं." दुसऱ्या एकानं लिहिलं, "कार सांभाळून चालव रस्त्यावर लोक असतात." आणखी एकानं लिहिलं, "तुम्ही दोघेही एकत्र चांगले दिसतात." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.