महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनुष्का बाळासह भारतात परतली, पापाराझींपासून दूर ठेवला मुलांचा चेहरा - Anushka Sharma - ANUSHKA SHARMA

Anushka Sharma Back in India : अकाय या मुलाला जन्म दिल्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा भारतात परतली आहे. आपल्या मुलांचा चेहरा सोशल मीडिया आणि पापाराझींपासून दूर ठेवण्याकडे तिचा कटाक्ष असतो. ती नेहमी आपल्या मुलांचे फोटो न काढण्याची विनंती पापाराझींना करत असते. तशी विनंती तिनं याहीवेळी केली.

Anushka Sharma
अनुष्का शर्मा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 5:34 PM IST

मुंबई - Anushka Sharma Back in India : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा आई वडील झाले. त्यांनी अकाय या छोट्या पाहुण्याचं आपल्या कुटुंबात स्वागत केलं. सोशल मीडियावर ही बातमी त्यानं चाहत्यांना देऊन याचा आनंद साजरा केला होता. बाळाला जन्म दिल्यानंतर अद्याप अनुष्का लंडनमध्येच राहात होती. आयपीलचा सीझन सुरू झाल्यानं विराट कोहली भारतात परतला होता. तेव्हापासून या स्टार कपलचे चाहते अनुष्का आणि तिच्या मुलाच्या पहिल्या झलकची वाट पाहत आहेत. आता या जोडप्याने आपल्या मुलाचा चेहरा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच आपल्या मुलांचे चेहरे दाखवणार आहेत. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, या जोडप्याने विमानतळावर पापाराझींना आपल्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. पापाराझी अकाऊंटवर अनुष्का भारतात परतल्याचं जाहीर करण्यात आलंय. विरल भयानीच्या इंस्टाग्राम हँडलवरील पोस्टनुसार, अनुष्का ही आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवण्यासाठी ओळखली जाते. तिने पापाराझींना विमानतळावर बेबी अकायची झलक दाखवली. ती जेव्हा एकटी असेल तेव्हा फोटोसाठी पोज देण्यासाठी ती स्वतः समोर येईल असं तिनं म्हटलंय.

पापाराझींच्या एका पोस्टमध्ये या बातमीला दुजोरा देताना त्यांनी लिहिलंय, "अनुष्का शर्माने विमानतळावर परतल्यानंतर पापाराझींना बाळाची एक खास झलक दाखवली आणि लवकरच भेटण्यासाठीचे आश्वासनही दिले. त्यावेळी मुलांशिवाय ती फोटोसाठी पोझ देईल असंही तिनं सांगितलं. याआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेट टुगेदरसाठी पापाराझींना त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्या वेळी, रणबीरने राहाचा चेहरा त्याच्या फोनवरून पॅप्सना दाखवला होता. यावेळी अनुष्कानंही पापाराझींना तिच्या दोन मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करण्यास परवानगी दिली नाही, तरीही ती म्हणाली की मुले आजूबाजूला नसतील तेव्हा ती स्वतःचा फोटोसाठी नक्की पोझ देईल."

अनुष्का आणि विराटने फेब्रुवारीमध्ये आनंदाने त्यांचा मुलगा अकायच्या जन्माची घोषणा केली होती. त्यांनी अकायची वामिकाचा लहान भाऊ म्हणून ओळख करून देत आपला आनंद आणि प्रेम व्यक्त केला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी डिसेंबर २०१७ मध्ये विवाहित होण्याची शपथ घेतली. 2018 मध्ये तिचा 'झिरो' चित्रपट रिलीज झाल्यानंतर, अनुष्काने अभिनयातून ब्रेक घेतला. त्यांच्या पहिल्या मुलाचा, वामिकाचा जन्म जानेवारी 2021 मध्ये झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details