मुंबई - Anushka Sharma and Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली सध्या चर्चेत आले आहे. या जोडप्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपे आपल्या मित्रांबरोबर रेस्टॉरंटमध्ये मस्ती करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेले फोटो अनेकांना आवडत आहे. हे फोटो विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या फॅन पेजवर आले आहेत. फोटोमध्ये मित्रांबरोबर विराट आणि अनुष्का खूप आनंदी दिसत आहेत. फोटोत विराट बसलेला दिसत आहे तर अनुष्का शर्मा त्याच्या खांद्यावर हात ठेवून आहे. हे दोघेही काळ्या पोशाखात खूप सुंदर दिसत आहे.
अनुष्का आणि विराटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल : या फोटोमध्ये अनुष्का शर्मा खूप क्यूट एक्सप्रेशन दिले आहेत. या फोटोवर आता अनेकजण कमेंट्स करत आहे. एका चाहत्यांन या फोटोवर कमेंट करत लिहिलं," मला अनुष्का आणि विराटची जोडी खूप सुंदर वाटते, दोघेही खूप खास आहेत." दुसऱ्या एकानं लिहिलं, " अनुष्का खूप सुंदर एक्सप्रेशन दिले आहे, ती दिसला खूप क्यूट दिसत आहे." आणखी एकानं लिहिलं, "अनुष्का चित्रपटसृष्टीत पुन्हा परत येणार की नाही." याशिवाय काहीजणांनी या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.