मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यपनं अलीकडेच बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरबरोबर लग्न केलं. या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. अनुराग हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या मुलीच्या लग्नाबाबत चर्चेत आहे. आता अनुराग कश्यपनं मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहेत. यामध्ये ते डीजेचं काम करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अनुराग खूप खुश असल्याचे दिसत आहे. आता अनुरागचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगान व्हायरल होत आहे. आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या रिसेप्शन पार्टीमधील अनेक व्हिडिओ काही सेलिब्रिंटीनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर यांची रिसेप्शन पार्टी :आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या रिसेप्शनमधील काही फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्री श्वेता बसू प्रसादनं आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं,'लाडकीवाले', अभिनंदन आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर, तुम्हा दोघांना खूप प्रेम.' तसेच श्वेतानं आलियाची आई अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजलाही ही पोस्ट टॅग केली आहे. दरम्यान एका व्हिडिओमध्ये अनुराग कश्यपचा जावई शेन पत्नी आलियाबरोबर ड्रम वाजवताना दिसत आहे. दरम्यान मुलगी आलियाच्या लग्नामध्ये अनुराग कश्यपची वेगळी स्टाईल पाहायला मिळाली.