मुंबई - Allu arjun: साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे चर्चेत आहे. शनिवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मे रोजी त्यानं आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे भेट दिली. याठिकाणी त्याचा वाईएसआरसीपी आमदार मैत्र सिल्पा रवी हे त्यांचा जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारत आता अल्लू अर्जुननं देखील हातभार लावला. दरम्यान अल्लू अर्जुन आमदाराच्या घरी आल्याची माहिती समजताच, त्याला पाहण्यासाठी तेथे मोठी गर्दी झाली होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. यानंतर पोलिसांनी अल्लू आणि त्याच्या सिल्पा रवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
अल्लू अर्जुनवर झाला गुन्हा दाखल : सिल्पा रवी, तिचे खरे नाव सिंगारेड्डी रविंचद्र किशोर रेड्डी आहे. सिल्पा रवी हे 13 मे रोजी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडणूक लढवणार आहोत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्लू अर्जुन आमदारांच्या घरी पाठिंबा दर्शवण्यासाठी पोहोचला होता. अल्लूला पाहण्यासाठी सिल्पा रवी यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. अल्लू त्याची पत्नी स्नेहा रेड्डी, सिल्पा रवी हे काही कुटुंबातील सदस्यांसह बाल्कनीत चाहत्यांना भेटायला आले. अल्लू अर्जुननं बाल्कनीतून चाहत्यांचे अभिवादन केलं. लोक मोठ्यानं पुष्पा, पुष्पाच्या घोषणा देत होते. वाईएसआरसीपीच्या प्रचाराच्या एका दिवसानंतर सिल्पा रवी आणि अल्लू अर्जुन यांच्यावर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.