मुंबई Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीनं राधिका मर्चंटसोबत विवाह केला. या जोडप्याच्या भव्य लग्नाला देश-विदेशातील मान्यवर पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अनंत आणि राधिका यांचा विवाह झाल्यानंतर आता अनेकजण या जोडप्याच्या हनिमून प्लॅनची चर्चा करत आहेत. पहिली अफवा अशी होती की, लग्नानंतर हे जोडपे रोमँटिक हनिमूनसाठी फिजी बेटावर जाऊ शकतात. यानंतर अनंत आणि राधिका हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेला पर्याय म्हणूनही ठेवू शकतात, असं बोललं जात होतं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं हनिमून: स्वित्झर्लंड, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, दक्षिण आफ्रिका, बोरा बोरा आयलंड, फिजी आयलंड अशी अनेक हनिमून डेस्टिनेशन्सची नावे समोर येत होती. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिका हे लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाणार नाहीत. त्यांनी हनिमूनचा प्लॅन पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नानंतरचे विधी पूर्ण करून हे जोडपे हनिमूनला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका दोघेही पारंपरिक गुजराती कुटुंबातून आहेत. वधू आणि वर दोघांच्याही घरी लग्नानंतरचे अनेक विधी असतात. अनंत आणि राधिका यांच्यासाठी लग्नानंतर 'सेवा' आणि 'दान' तसंच काही विशेष पूजा विधींचे आयोजन करण्यात आले आहेत.