महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचे फोटो शनाया कपूरनं केले शेअर - SHANAYA KAPOOR - SHANAYA KAPOOR

Shanaya Kapoor : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला बॉलिवूड स्टार किडनं हजेरी लावली. अलीकडेच, संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनं इटलीतील तिच्या बेस्टीज सुहाना खान आणि अनन्या पांडेबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

Shanaya Kapoor
शनाया कपूर (शनाया कपूर फोटो (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 4:03 PM IST

मुंबई - Shanaya Kapoor : बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचा आनंद घेत आहे. या ग्रँड पार्टीतील तिचे सुंदर फोटो तिनं पोस्ट केले आहेत. आज, 2 जून रोजी तिनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या ग्रँड प्री - वेडिंगमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, "हे प्रेम आहे." फोटोमध्ये शनाया ही बेस्ट फ्रेंड्स सुहाना खान आणि अनन्या पांडेबरोबर दिसत आहे. या फोटोबरोबर तिनं लिंबू आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. तिनं शेअर केले फोटो आता अनेकांना आवडत आहेत. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये शनाया बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे.

शनाया कपूरनं फोटो केला शेअर :तसेच काही फोटोमध्ये शनायाबरोबर सुहाना खान आणि अनन्या पांडे फोटोसाठी पोझ देत आहेत. आता या तिघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवर एका चाहत्यानं लिहिलं, "सुहाना खान,अनन्या पांडे आणि शनाया कपूर छान दिसत आहेत." दुसऱ्या एकानं लिहिलं, "केकेआर जिंकल्यानंतर आता सर्वजण मजा करत आहे." आणखी एकानं लिहिलं, "शनाया तुझा फोटो खूप सुंदर आहे." याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट शेअर करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच फोटोवर शनाया कपूरचे वडील अभिनेता संजय कपूर यांनी देखील कमेंट केली आहे.

शनाया कपूर आगामी चित्रपट : यानंतर अनन्यानं या पोस्टवर कमेंट देत लिहिलं, "मी सर्वोत्तम आहे." याशिवाय अनन्याची आई भावना पांडे यांनी कमेंट विभागात स्मायली इमोजी पोस्ट केले आहेत. दरम्यान शनाया ही मल्याळम 'वृषभा' या चित्रपटामध्ये मोहनलालबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट नंदा किशोर यांनी दिग्दर्शित केला आहे. 'वृषभा' चित्रपट रुपेरी पडद्यावर 2024 रोजी प्रदर्शित होईल. याशिवाय ती 'बेधडक' बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान हे करत आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. सुशांत सिंहच्या स्मृतीदिनानिमित्त बहीण श्वेता कीर्तीनं केदारनाथला दिली भेट, शेअर केले फोटो - Sushant Singh Rajput Sister Shweta
  2. प्रीती झिंटा सहा वर्षानंतर बॉलीवुडमध्ये परतणार, पोस्ट शेअर करत दाखवली 'लाहोर 1947'ची झलक - preity zinta share post
  3. सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case

ABOUT THE AUTHOR

...view details