महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत अंबानींकडून शाहरूखसह खास मित्रांना महागड्या घड्याळाची भेट, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का - Anant Radhika Wedding - ANANT RADHIKA WEDDING

Anant Ambani Gifted Expensive Watch To Friends : रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी त्यांच्या धाकट्या मुलाचं म्हणजेच अनंतचं लग्न मोठ्या थाटात केलं. तसंच अनंत अंबानी यांनी लग्नात वरानं आलेल्या खास मित्रांना एक मौल्यवान घड्याळ भेट दिलीय. या घड्याळाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Anant Ambani gifted audemars piguet royal oak perpetual watch to srk and special friends at the wedding
अनंत अंबानीने लग्नात मित्रांना दिलं खास गिफ्ट (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 11:40 AM IST

मुंबई Anant Ambani Gifted Expensive Watch To Friends : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानं 12 जुलै रोजी त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत लग्न केलं. राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाच्या सध्या सर्वत्र चर्चा असून आहेत. अनंत अंबानी यांनी आपल्या लग्नात त्याच्या जवळच्या मित्रांना कोट्यावधी रुपयांची आलिशान घड्याळं भेट दिल्याची माहिती समोर आलीय. या घड्याळांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे घड्याळ शाहरुख खानच्या हातातही पाहायला मिळालं.

  • व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओनुसार, अनंत अंबानी यांनी त्यांच्या खास मित्रांना भेट दिलीय. या घड्याळाची किंमत 2 ते 3 कोटी रुपये आहे. एका Reddit पोस्टनुसार, अनंतनं त्याच्या जवळच्या मित्रांना ऑडेमार्स पिगेटचे 25 घड्याळ दिले आहेत. जगात अशा केवळ 25 घड्याळांची निर्मिती करण्यात आली आहे.

शाहरुखसह 'या' स्टार्सना मिळाल्या खास भेटवस्तू : अनंतनं शाहरुख खान, रणवीर सिंग, शिखर पहाडिया, वीर पहाडिया, मीजान जाफरी यांच्यासह काही खास मित्रांना ही घड्याळ भेट दिली आहे. हे घड्याळ 18 कॅरेट रोझ गोल्ड रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर आहे. हे ल्युमिनरी एडिशन आहे. यात रोझ गोल्ड डायल आणि ब्लॅक सब-डायल आहेत. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आज (14 जुलै) मुंबईत होणार आहे. त्यामुळं आजही या रिसेप्शन पार्टीत सिनेतारकांची मांदियाळी बघायला मिळेल. तर सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनंत आणि राधिकानं लग्नाचा निर्णय घेतला. अखेर 12 जुलै रोजी दोघं लग्नबंधनात अडकले.

हेही वाचा -

  1. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांना पंतप्रधान मोदींनी दिले आशीर्वाद; विवाह सोहळ्यातील धार्मिक कार्याला हजेरी - Pm Modi In Anant Radhika Wedding
  2. अनंत राधिकाच्या लग्नात दोन संशयितांची घुसखोरी; बीकेसी पोलिसांनी दाखल केले गुन्हे - Anant Radhika Wedding
  3. अंबानीच्या विवाहाचा बीकेसीतील कर्मचाऱ्यांना फटका, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' - ANANT RADHIKA WEDDING

ABOUT THE AUTHOR

...view details