मुंबई - Amitabh bachchan : दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे त्याच्या चित्रपटांमुळे कायमचं चर्चेत असतात, दरम्यान यावेळी ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते सर्व चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना, की हा कुठला फोटो आहे, ज्यामुळे अनेकजणांनाच्या चेहऱ्यावर हसू येत आहेत. बिग बीचा हा फोटो पाहून अनेकजण सोशल मीडियावर त्याचं कौतुक करत आहेत. अमिताभ यांचा विनोदी चेहरा पाहून चाहते या फोटोच्या पोस्टमध्ये कमेंट्स करत आहेत.
अमिताभ बच्चननं शेअर केला फोटो :अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ''कृपया या पोस्टसाठी कोणी शब्द सुचवू शकेल का?'' यासोबत त्यांनी हात जोडलेले तीन इमोटिकॉन्सही शेअर केले आहेत. अमिताभ यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, 'खाइके पान बनारस वाला' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'वाह सर खूप सुंदर'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''या फोटोमध्ये तुम्ही छान दिसत आहेत. हा फोटो सुंदर आहे.''