महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'नं जगभरात कमवला 1300 कोटींचा गल्ला, 'आरआरआर', 'केजीएफला 2'ला ही टाकलं मागं - PUSHPA 2 BOX OFFICE COLLECTION

'पुष्पा 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपल्या गल्ल्यात भरपूर वाढ केली आहे. भारतात 900 केटी कमवणाऱ्या या चित्रपटानं जगभरात 1300 कोटी कमवले आहेत.

PUSHPA 2 BOX OFFICE COLLECTION
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन (PUSHPA 2 poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 5 hours ago

मुंबई - अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या नवीन रिलीज झालेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक नवे विक्रम तयार करत या चित्रपटानं विक्रमी संकलन केलं आहे. जागतिक आणि देशांतर्गत कमाईतही हा सिनेमा सर्वांना पिछाडीवर टाकत चालला आहे. आतापर्यंतच्या तीन सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे.

'पुष्पा 2' ची 11 व्या दिवशीची कमाई

'पुष्पा 2' च्या रिलीजला 11 दिवस पूर्ण झालेत. या अकरा दिवसात या चित्रपटानं भरतात तब्बल 900 कोटींचा गल्ला गोळा केला आहे. 11व्या दिवशी, इंडस्ट्री ट्रॅकर्सच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटानं भारतात सुमारे 75 कोटी रुपये कमावले. यामध्ये तेलुगू व्हर्जनचं योगदान 16 कोटी रुपये, हिंदीचं 55 कोटी रुपये आणि तमिळ, कन्नड आणि मल्याळमचं यामध्ये छोटं योगदान आहे. या जलद कमाई वाढीमुळे पुष्पा 2 ची जागतिक कमाई 1300 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यामुळे हा तिसरा-सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे.

पॅन इंडिया चित्रपटांच्या यापूर्वीचा मागोवा घेतला तर 'पुष्पा 2' नं हिंदी मार्केटमध्ये झपाट्यानं यश मिळवलं आहे. केवळ हिंदीमध्ये 500 कोटी रुपयांच्या निव्वळ कलेक्शनसह, 'पुष्पा 2' सर्वात जलद हा टप्पा गाठणारा चित्रपट बनला आहे. बॉक्स ऑफिसवरील या कलेक्शनमुळं 'पुष्पा 2' नं शाहरुख खानच्या 'जवान'ला मागं टाकलं आहे. हा आकडा गाठण्यासाठी जवानला 18 दिवस लागले होते.

'पुष्पा 2' चे जगभरातील यश : 'आरआरआर', 'केजीएफला 2'ला ही टाकलं मागं...

जागतिक स्तरावर पुष्पा 2 ने RRR (रु. 1230 कोटी) आणि KGF: चॅप्टर 2 (रु. 1215 कोटी) च्या आजीवन कलेक्शनला मागे टाकून तिसरा सर्वात मोठा भारतीय कमाई करणारा ठरला आहे. सध्या, चित्रपट फक्त बाहुबली 2 (रु. 1790 कोटी) आणि आमिर खानच्या दंगल (रु. 2070 कोटी) च्या मागे आहे, जे अव्वल स्थानावर आहे. त्याच्या सातत्यपूर्ण यशामुळे, पुष्पा 2 अखेरीस बाहुबली 2 ला दीर्घकाळ मागे टाकू शकेल, अशी शक्यता वाढत आहे, जो आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा भारतीय चित्रपट बनला आहे.

'पुष्पा 2' चे दिवस आणि आठवड्या प्रमाणे बॉक्स ऑफिस कलेक्शन

  • पहिल्या आठवड्याची कमाई 725.8 कोटी
  • दिवस 9 : 36.4 कोटी
  • दिवस 10 : 63.3 कोटी
  • दिवस 11 : 75 कोटी (प्रारंभिक अंदाज)
  • एकूण रु. 900.5 कोटी

'पुष्पा 2' चित्रपटाचं विक्रम रचण्याचं, नवे विक्रम तयार करण्याचं काम सुरूच आहे. या चित्रपटानं जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड देँणारा चित्रपट म्हणून 750 कोटी रुपयांची कमाई केली. देशांतर्गत, केवळ सुरुवातीच्या वीकेंडमध्येच 600 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सर्वाधिक ओपनिंग देणारा चित्रपट म्हणूनही लौकिक कमवला आहे.

'पुष्पा 2' ने तोडलेल्या प्रमुख विक्रमांवर एक नजर टाका:

  • जगभरात सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड देणारा भारतीय चित्रपट (७५० कोटी कमाई)
  • भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड (600 कोटी)
  • भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे (209 कोटी कमाई)
  • हिंदी बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठा ओपनिंग दिवस ( 70.30 कोटी)
  • हिंदीमध्ये (10 दिवसात) 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणारा पहिला चित्रपट
  • 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट (10 दिवसांत 1292 कोटी रुपये)

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा'च्या कमाईत आश्चर्यकारक वाढ

विशेष म्हणजे, चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात एका महिलेचा चिरडून मृत्यू झाला व त्याच महिलेचा मुलगाही गंभीर जखमी झाला. यामुळे चित्रपटाच्या टीमवर पोलीस कारवाई झाली. यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनलाही अटक झाली आणि एक दिवस त्याला अंतरिम जामीन मिळूनही तुरुंगात रात्र काढावी लागली. दरम्यान, अल्लू अर्जुननं पीडित महिलेसाठी 25 लाखाची मदत जाहीर केली होती. जखमी मुलाच्या रुग्णालयाचा खर्चही त्यानं उचलण्याची जबाबदारी घेतली होती. या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्यानंतर चित्रपटाच्या कमाईतही वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये 10 व्या दिवशीच कलेक्शन 73.90% ने वाढलं, त्यानंतर रविवारी, 11 व्या दिवशी यामध्ये 18.48% वाढ झाली. वीकेंडचा परफॉर्मन्स मजबूत मानला गेला तरीही ही वाढ आश्चर्यकारक होती.

(बॉक्स ऑफिस डेटा सॅकनिल्क आणि मैत्री मूव्ही मेकर्सच्या अहवालानुसार आहे.)

ABOUT THE AUTHOR

...view details