मुंबई :अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ॲक्शन चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. या 8 दिवसात 'पुष्पा 2' चित्रपटानं देशांतर्गत आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं 'कल्की 2898 एडी', 'स्त्री 2', 'जवान',' पठाण' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं हिंदी पट्ट्यामध्ये जोरदार कमाई केली आहे. आता 'पुष्पा 2' चित्रपटाची नजर ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' या चित्रपटावर आहे. एसएसएस राज राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' चित्रपटानं बॉक्स ऑफिस जोरदार कमाई केली होती.
'पुष्पा 2'चं जगभरातील कलेक्शन :आता 'पुष्पा 2' हा चित्रपट आज 13 डिसेंबर रोजी 'आरआरआर'चा विक्रम मोडू शकतो. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'पुष्पा 2'नं आतापर्यंत भारतातील सर्व भाषांमध्ये 726.26 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यानुसार या चित्रपटानं जगभरात 1067 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान ओपनिंग वीकेंडमध्ये या चित्रपटानं 529 कोटींची कमाई केली. आता आठवड्यात 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटानं पहिल्या सोमवार 64.45 कोटी, मंगळवारी 51.55 कोटी, बुधवारी सर्व भाषांमध्ये 43.35 कोटी रुपये कमावले. या चित्रपटानं गुरुवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी 37.9 कोटीची कमाई केली.
'पुष्पा 2'चं हिंदी बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन : 'पुष्पा 2'नं हिंदी भाषेत धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटानं हिंदीमध्ये 406.5 कोटीचा व्यवसाय केला आहे. 'पुष्पा 2'नं हिंदीमध्ये सर्वाधिक नेट कलेक्शन केलं आहे. अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटानं रिलीजच्या सात दिवसांतच 1000 कोटींहून अधिक कमाई केली होती.
डे इंडिया नेट कलेक्शन
पहिल्या दिवशी 164.25 कोटी रु.
दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटी रु.
तिसऱ्या दिवशी 119.25 कोटी रु.