मुंबई - Allu Arjun : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2'मुळे चर्चेत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा टप्पा सुरू आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेकजण वाट पाहत आहेत. दरम्यान 20 मार्च रोजी रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2' चित्रपटातील तिचे शेवटचे शेड्यूल पूर्ण करताना दिसली. हा चित्रपट याच वर्षी 15 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' रिलीज होत आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटामध्ये रुपेरी पडद्यावर टक्कर पाहायला मिळेल. या चित्रपटाकडून अल्लू अर्जुनला खूप अपेक्षा आहेत.
अल्लू अर्जुननं चाहत्याचे मानले आभार : अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग अजय देवगणपेक्षा जास्त आहे. अजयचे सोशल मीडियावर 11.5 दशलक्ष चाहते आहेत तर अल्लूचे इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष झाले आहेत. अल्लू अर्जुनचे 20 मार्च रोजी इंस्टाग्रामवर 25 दशलक्ष चाहते झाले आहेत. दरम्यान त्यानं सोशल मीडियावर ओक पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''थँक्यू ग्रेटफुल फॉरएवर'' या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. याशिवाय त्याला त्याच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2'साठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर कोणत्या स्टार्सचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत ते जाणून घेऊया.
कोणत्या साऊथ स्टारचे किती इन्स्टा फॉलोअर्स आहेत?
यश - 13.5 दशलक्ष
महेश बाबू - 13.3 दशलक्ष
प्रभास - 11.7 दशलक्ष
विजय - 10.08 दशलक्ष