मुंबई - Allu Arjun in Europe : अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर आगामी चित्रपट 'पुष्पा 2- द रुल' हा आता 6 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 15 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे अल्लू अर्जुनचे अनेक चाहते नाराज आहेत. दरम्यान आता अल्लू हा आपल्या कुटुंबाबरोबर युरोप टूरवर गेला आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या कुटुंबाबरोबरचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 21 जुलै रोजी त्यांची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डीनं चाहत्यांना त्यांच्या मजेदार सुट्टीची झलक दाखविल्यानंतर पुन्हा एकदा अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे.
अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह युरोपमध्ये सुट्टीवर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - allu arjun - ALLU ARJUN
Allu Arjun in Europe : अल्लू अर्जुन हा यूरोपमध्ये सुट्टीवर आहे. स्नेहा रेड्डीनं काही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, यात अल्लू अर्जुन हा आपल्या कुटुंबाबरोबर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.
Published : Jul 22, 2024, 7:11 PM IST
स्नेहा रेड्डीनं शेअर केले फोटो : शेअर केलेल्या फोटोमध्ये डोंगराच्या शिखरावर स्नेहा ही पती अल्लू अर्जुन आणि मुलांसह दिसत आहे. याशिवाय तिनं काही सुंदर दृश्याची फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका फोटोंमध्ये अल्लू हा फॅमिली सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. या फोटो कॅप्शनमध्ये तिनं 'रेस्ट स्टॉप' असं लिहिलं आहे. अल्लू अर्जुन अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर परदेशात टूरवर जात असतो. स्नेहा रेड्डी आणि अल्लू अर्जुन अनेकादा आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अल्लू अर्जुनचं वर्कफ्रंट : दरम्यान अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2- द रुल' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर यात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, फहाद फासिल, रश्मिका मंदान्ना, विजय सेतुपती, विजय सेतुपती, अनसुया भारद्वाज, प्रियामणी, दिवी वध्या, जगपती बाबू, प्रकाश राज, सुनील, राव रमेश, ब्रह्माजी, दयानंद रेडी आणि इतर स्टार्स असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय. 'पुष्पा 2- द रुल' चित्रपटाची निर्मिती रायटिंग्ज बॅनरखाली केली गेली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच पुढे आता अल्लू अर्जुन हा 'आयकॉन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिल राजू हे करत आहेत. याशिवाय त्याचा 'एए 22' हा चित्रपट देखील चर्चेत आहे.