महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारनं रणवीर सिंगला त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा - akshay wishes birthday ranveer

Akshay Kumar wishes birthday Ranveer Singh : अक्षय कुमारनं रणवीर सिंगला त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं सोशल मीडियावर रणवीरबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 1:01 PM IST

Akshay Kumar wishes birthday Ranveer Singh
अक्षय कुमारनं रणवीर सिंगला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा ((IMAGE- AKSHAY KUMAR/IG POST))

मुंबई - Akshay Kumar wishes birthday Ranveer Singh :बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आज त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं त्याचे चाहते आणि बॉलिवूड सेलेब्स त्याला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान अक्षय कुमारनेही रणवीर सिंगला आपल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्याला आगामी 'डॉन 3' चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. याशिवाय खास प्रसंगी अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीनेही रणवीर सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली आहे.

अक्षय कुमारनं रणवीर सिंगला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा : दरम्यान अक्षय कुमारनं रणवीर सिंगला त्याच्या वाढदिवसाच्या खूप मजेदार पद्धतीनं शुभेच्छा दिल्या असून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो करण औजलाच्या 'सॉफ्टली' गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. रणवीर सिंग खांद्यावर ब्लूटूथ स्पीकर घेऊन नाचताना पाहून अनेक चाहते हसण्याचे इमोजी या पोस्टवर करत आहेत. रणवीरचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. या पोस्टवर अक्षयनं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, "हॅपी बर्थडे रणवीर सिंग, तू एक पॉवर हाऊस माणूस आहेस, तुझी एनर्जी तुला खूप पुढे नेऊ दे, तुझा दिवस आनंदात जावो, प्रेम आणि प्रार्थना माझ्या तुझ्याबरोबर आहेत." आता अक्षय कुमारच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

रणवीर सिंगचे आगामी चित्रपट :अक्षय कुमार आणि रणवीर सिंग एकत्र 'सिंघम अगेन' चित्रपटामध्ये रोहित शेट्टीबरोबर काम करणार आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. या चित्रपटामध्ये अजय देवगण, करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सिंग शेवटी आलिया भट्टबरोबर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसला होता. त्याच्या या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली होती. दरम्यान पुढं तो 'अंदाज अपना अपना 2'मध्ये रणबीर कपूरबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय तो 'तख्त' आणि 'सिम्बा 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा 'संगीत सोहळा' संपन्न - sangeet ceremony
  2. 'मिर्झापूर'चा चार वर्षानंतर सीझन 3 रिलीज, सोशल मीडियावर प्रेक्षकांचा 'गजब भौकाल हैं'! - Mirzapur Season 3 X Review
  3. कंगना राणौतला झापड मारणाऱ्या कुलविंदर कौरची बदली? काय आहे प्रकरण जाणून घ्या... - KULWINDER KAUR IS STILL SUSPENDED

ABOUT THE AUTHOR

...view details