मुंबई - तमिळ भाषेतील दिग्दर्शिका सुधा कोंगारा हिने बनवलेला 'सरफिरा' हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या अफाट कर्तृत्वाची अनोखी कथा होती. यापूर्वी 'सूरराई पोत्रू' या शीर्षकाखाली हा चित्रपट बनला होता आणि यातील जबरदस्त कथानकासह चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट अक्षय कुमारला घेऊन सुधा कोंगाराने पुन्हा हिंदीमध्ये बनवला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
हा तामिळ चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता सुर्यानं साकारलेली भूमिका 'सरफिरा'मध्ये अक्षय कुमारनं साकारली आहे. अक्षय कुमार आणि राधिका मदन यांच्याबरोबर या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये परेश रावल, सीमा बिस्वास, आर. सरथ कुमार, सौरभ गोयल आणि बऱ्याच जणांचा समावेश आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टारच्या टीमनं शेअर केलेल्या एका निवेदनामध्ये अक्षय कुमार म्हणाला, "मोठं स्वप्न पाहण्याचं साहस केलेल्या वेड्या माणसाची गोष्ट असलेला 'सरफिरा' हा चित्रपट आहे. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तो अविरत प्रयत्न करत राहतो. जेव्हा एखाद्या स्वप्नाचं महत्त्वकांक्षेमध्ये रुपांतर होतं, तेव्हा काहीही चमत्कार होऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे. सामान्य लोकांसाठी एक क्रांतीकारक बदल घडवून आणणाऱ्या या चित्रपटातील वीरच्या स्वप्नाबद्दल मला आदर वाटला. माझ्यात असलेल्या आंतरिक विश्वासाला बळ देणारी स्क्रिप्ट असल्याचं मला वाटलं. हा चित्रपट आता मी माझ्या आंतरिक विश्वासांना स्क्रिप्टचा एक भाग असल्याचे पाहिले आहे, 11 ऑक्टोबर 2024 रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे आणि जगाला प्रेरणा देणारे स्वप्न हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे!"
या चित्रपटाविषयी बोलताना राधिका मदन म्हणाली, "सरफिरा ही दृढ निश्चयाची आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या धाडसाची एक सशक्त कथा आहे. आत्मविश्वास आणि सामर्थ्यानं ओथंबून भरलेली राणी ही व्यक्तिरेखा साकारणं हा माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक अनुभव होता. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्या अभिनयाचे प्रेक्षकांनी केलेले स्वागत डिस्नेप्लस हॉटस्टारसह चित्रपटामध्ये अतुलनीय ऊर्जा घेऊन आले आहे."
केप ऑफ गुड फिल्म्स, अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि 2डी एंटरटेनमेंट निर्मित, सुधा कोंगारा दिग्दर्शित, 'सरफिरा' 11 ऑक्टोबर रोजी डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.