महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सराफिरा'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये चमकले स्टार्स, व्हिडिओ व्हायरल - Akshay Kumar - AKSHAY KUMAR

Sarfira Special Screening: अक्षय कुमार आणि राधिका मदनचा चित्रपट 'सराफिरा' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी एका विशेष स्क्रीनिंग आयोजन केलं होतं. या खास प्रसंगी साऊथ सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिकाही दिसले.

Sarfira Special Screening
सराफिरा स्पेशल स्क्रिनिंग ((IMAGE- ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 2:15 PM IST

Updated : Jul 10, 2024, 3:11 PM IST

मुंबई - Sarfira Special Screening : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री राधिका मदान स्टारर आगामी चित्रपट 'सरफिरा' थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी मंगळवारी 9 जुलै रोजी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अक्षय कुमार, राधिका मदन यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. दरम्यान साऊथ सिनेसृष्टीतील हिट कपल आणि चित्रपट निर्माते सूर्या आणि ज्योतिका हे देखील रात्री मुंबईत अक्षय कुमारच्या 'सरफिरा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले होते. प्रीमियरनंतर सूर्या आणि ज्योतिका यांच्यासह अक्षय कुमार, राधिका मदन आणि दिग्दर्शक सुधा कोंगारा यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिली.

'सरफिरा' स्पेशल स्क्रीनिंग (Etv Bharat)

'सरफिरा' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग :आता 'सरफिरा'च्या स्पेशल स्क्रिनिंगमधून चित्रपटातील कलाकारांची एक झलक समोर आली आहे. या खास सोहळ्यासाठी 'सरफिरा'मधील मुख्य अभिनेत्री राधिका मदन ब्लू कलरची साडी नेसली होती. यावेळी तिनं तिच्या लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा लूक अनेक चाहत्यांना देखील आवडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या ती संपूर्ण चित्रपटाच्या टीमबरोबर दिसत आहे. दरम्यान यापूर्वी या चित्रपटामधील 'चावट' गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्याला लोकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. राधिकाची या गाण्यामधील शैली अनेकांना आवडली आहे. हे गाणं श्रेया घोषालनं गायलं आहे.

'सरफिरा' चित्रपटाबद्दल:'सराफिरा' हा चित्रपट तमिळ सुपरस्टार सुर्याच्या 'सूरराई पोत्रू' चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केलं आहे. सुधा कोंगारा यांनी 'सूरराय पोत्रू'चं देखील दिग्दर्शन केलं होतं. सुर्या आणि त्याची पत्नी ज्योतिकानं 'सराफिरा' या चित्रपटाची निर्मिती केली आहेत. अक्षय कुमारचा हा चित्रपट 12 जुलै रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटात खिलाडी कुमार, राधिका मदान व्यतिरिक्त परेश रावल, सीमा बिस्वास, राहुल वोहरा, आर. सरथकुमार, सौरभ गोयल, अनिल चरणजीत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सूर्या या चित्रपटात कॅमियो करताना दिसणार आहे.

Last Updated : Jul 10, 2024, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details