महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी त्रिकुट विमानतळावर स्पॉट, 'हेरा फेरी 3' चं शूटिंग सुरू झालं? - SHOOTING OF HERA PHERI 3

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी त्रिकुट एकत्र दिसल्यानं 'हेरा फेरी 3' चं शूटिंग सुरू झाल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधायला सुरुवात केली आहे.

Akshay Kumar, Paresh Rawal and Sunil Shetty
अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी ((ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 11, 2024, 6:19 PM IST

मुंबई - अभिनेत्री अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे त्रिकुट 'हेरा फेरी 3'मध्ये पुन्हा एकदा धमाल कॉमेडी करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच होईल असा अंदाजही वर्तवला जात आहे. अलीकडेच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल मुंबईच्या खाजगी विमानतळावर एकत्र दिसल्यानंतर या कालाकारांनी 'फेरा फेरी 3' ची तयारी सुरू केल्यांची चर्चा सुरू झाली आहे.

आज 11 नोव्हेंबर रोजी अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना मुंबईतील खाजगी विमानतळावर पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिन्ही स्टार्स कॅज्युअल लूकमध्ये दिसत होते. विमानतळाच्या आत जाण्यापूर्वी तिघांनी एकत्र पॅप्ससाठी पोज दिली आहे.

यावेळी अक्षय कुमार ब्लॅक शर्ट आणि चेक ग्रे पँटमध्ये दिसला. सनग्लासेस घातलेला खिलाडी कुमार खूपच सुंदर दिसत आहे. तर सुनील शेट्टी पांढऱ्या पोशाखात आणि काळा सनग्लासेसमध्ये खूपच मस्त दिसत होता. परेश रावलच्या लूकबद्दल बोलायचे तर त्याने प्रिंटेड ब्लू शर्ट आणि नेव्ही ब्लू पॅन्ट घातली होती.

तिघांनाही एकत्र पाहून 'हेरा फेरी 3'चे शूटिंग सुरू झाल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. एका चाहत्याने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, 'वाह, हेरा फेरी 3 बनण्याच्या मार्गावर आहे'. आणि एकानं लिहिलय की, 'हेरा फेरी लीजेंड'.

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी पुन्हा एकदा त्यांच्या कॉमिक कॅरेक्टर्स राजू, बाबुराव आणि श्याम या कॉमेडी चित्रपटात दिसू शकतील. या चित्रपटाच्या निमितीची गोषणा जरी निर्मात्यंनी यापूर्वी केलेली असली तरी 'हेरा फेरी 3'च्या घोषणेनंतर निर्मात्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. सुरुवातीच्या काळात अक्षय कुमारनं या प्रोजेक्टला नाही म्हटलं होतं. पण नंतर जेव्हा तो शूटिंगसाठी पुन्हा तयार झाला, तेव्हा चित्रपटाच्या कायदेशीर हक्कांबाबत एक समस्या निर्माण झाली. या समस्येचं निर्माते फिरोज नाडियादवाला यांना निराकरण करावं लागलं. हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी शूटिंग फ्लोरवर जाणार होता, पण त्यामुळे तो थांबला होता. आता यातील सर्व अडथळे दूर झाल्याचं समजतंय.

ABOUT THE AUTHOR

...view details