महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनीत 'जॉली एलएलबी 3'ची शुटिंग सुरू - AKSHAY KUMAR AND ARSHAD WARSI - AKSHAY KUMAR AND ARSHAD WARSI

Jolly LLB 3 : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर 'जॉली एलएलबी 3'ची शुटिंग सुरू झाली आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Jolly LLB 3
जॉली एलएलबी 3 (social media)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 9:07 PM IST

मुंबई - Jolly LLB 3 :हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी त्यांच्या आगामी 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अजमेरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी डीआरएम कार्यालयात विशेष न्यायालय कक्षही बनवण्यात आला आहे. दरम्यान, 'जॉली एलएलबी 3' चा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात खरा जॉली आणि नकली जॉली याबद्दल लढाई पाहायला मिळत आहे. बॉलिवूडची ही हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. कॉमेडी कोर्टरूम ड्रामा फिल्म 'जॉली एलएलबी 3' चा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

'जॉली एलएलबी 3'ची शुटिंग सुरू :व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र दिसत आहेत. या चित्रपटाची कहाणी खरा आणि नवली जॉली यांच्यातील कायदेशीर लढाईवर आधारित असणार आहे. 29 एप्रिलला शूटिंगचा पहिला दिवस होता. आज, 2 मे रोजी अक्षय कुमारनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि 'जॉली एलएलबी 3'च्या शूटिंग अपडेटसह स्टार कास्टच्या फर्स्ट लुकची झलक शेअर केली. आता काही दिवसापूर्वी अर्शद वारसीचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत तो अजमेरमधील दर्गाहमध्ये नमाज पठण करताना दिसत होता. तेव्हापासून या चित्रपटाबाबत लोकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली होती.

कुठला जॉली डेट खरा :'जॉली एलएलबी' 2013 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर 'जॉली एलएलबी 2' 2017 मध्ये रिलीज झाला होता. दोन्ही भाग हिट झाल्यानंतर आता 'जॉली एलएलबी 3' रिलीज होणार आहे. या चित्रपटात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार वकिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी दोघेही 'जॉली एलएलबी 3' मध्ये एकत्र दिसेल. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओची सुरुवात अर्शदपासून होते. तो सर्वांना सावध करत म्हणतो, 'जगदीश त्यागी उर्फ जॉली बीए एलएलबी डुप्लिकेटपासून सावध रहा.' यानंतर, अक्षय स्वतःची ओळख करून देतो आणि म्हणतो, 'जगदीश्वर मिश्रा बीएएलएलबी मूळचा लखनौचा'. व्हिडिओच्या शेवटी सौरभ शुक्लाची झलक दाखविण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. भारतीय संघाला प्रोत्साहन देताना अमिताभ बच्चननं 'अश्वत्थामा'च्या रुपात टी 20 वर्ल्ड कप 2024ची केली घोषणा - Amitabh Bachchan
  2. ईशा देओलनं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 44वा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा - DHARMENDRA HEMA WEDDING ANNIVERSARY
  3. 'इंडियन आयडॉल'च्या स्टेजवर गोविंदानं मुलगा यशबरोबर केला सुंदर डान्स, व्हिडिओ व्हायरल - GOVINDA DANCE VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details