मुंबई - Akshay kumar 'Khudaya' out : अक्षय कुमार हा सध्या 'सिरफिरा' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अक्षयला सामाजिक विषयांवर चित्रपट बनवायला आवडतात. या चित्रपटाचं काही दिवसापूर्वी पहिलं गाणं रिलीज झालं होत. आज 27 जून रोजी या चित्रपटामधील दुसरं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 'सिरफिरा'चं दुसरे गाणं 'खुदाया' हे सुफी असून या गाण्याला जबरदस्त प्रसिसाद मिळत आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमार आणि राधिका मदन हे वेदनेत बुडलेले दिसत आहेत. 'खुदाया' गाण्यात राधिका आणि अक्षयमधील अनेक भावनिक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या गाण्याला सागर भाटिया, नीती मोहन आणि सुहित अभ्यंकर यांनी आवाज दिला आहे.
'सिरफिरा'मधील दुसरे गाणं रिलीज :'खुदाया'चं बोल मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. दरम्यान या चित्रपटामधील पहिल्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर 'मार उडी'मधील भाव खूप वेगळा आहे. 'सिरफिरा'चं पहिलं गाणं, 'मार उडी' उत्साह भरलेले आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या रिलीजनंतर काही तासही त्याला लाखो व्ह्यूज मिळाले. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमारला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. कारण याआधी त्याचा रिलीज झालेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ दिसला होता.