मुंबई - अभिषेक बच्चनची पत्नी, बच्चन परिवाराची सून, आराध्याची आई आणि राय कुटुंबाची कन्या म्हणून आपल्या सर्व जबादाऱ्या पार पाडत असलेली ऐश्वर्या राय जगातील सर्वात सुंदर व्यक्ती ठरली होती. तिनं 1994 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा ताजही जिंकला होता. त्यानंतर गेल्या 3 दशकात ती चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून सक्रिय असून अनेक सुपरहिट चित्रपटही तिच्या नावावर आहेत. पण ऐश्वर्याला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण ती सिनेक्षेत्राकडं कशी वळली याबद्दल जाणून घेऊयात.
ऐश्वर्या राय ज्युनियर कॉलेजला असताना एका फोटो जर्नालिस्ट असलेल्या प्राध्यापकानं तिला तिला फॅशन फीचरसाठी निवडलं आणि तिचा ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश झाला. यानंतर तिला या करिअरमध्ये अनेक संधी दिल्या. मात्र, ऐश्वर्याला मनोमन डॉक्टर व्हायचं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीनं शोबिजमध्ये प्रवेश करण्याबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली की याची सुरुवात तिच्या ज्यनियर कॉलेजला असतानाच्या दिवसात झाली. आपल्या कुटुंबातील कोणीही चित्रपटसृष्टीत नसल्याचा खुलासा तिनं केला. त्यामुळेच तिचं संपूर्ण लक्ष अभ्यासावर होतं. कठोर परिश्रम करून पदवी मिळवून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू असं त्याकाळात तिनं ठरवलं होतं.