मुंबई - Aishwarya Rai and Aaradhya Bachchan :आराध्या बच्चन तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. आराध्या ही स्टारकिड्समध्ये सर्वाधिक चर्चेत असते. आजकाल ती अनेकदा तिची आई ऐश्वर्या रायबरोबर कार्यक्रमांमध्ये जाताना दिसते. अलीकडेच, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. दोघेही बच्चन कुटुंबासोबत लग्नाला आल्या नव्हत्या, त्या वेगळ्या आल्या होत्या. मात्र कार्यक्रमादरम्यान अभिषेक बच्चनबरोबर दिसल्या. अंबानी फॅमिली फंक्शन झाल्यानंतर दोघेही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाल्या आहेत. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहेत.
ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन मुंबईवर झाल्या स्पॉट :व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या दोघीही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. दोघांनीही त्यांच्या पोशाखांबरोबर मॅचिंग बॅग घेतल्या आहेत. यावेळी ऐश्वर्या राय आणि आराध्या पापाराझींशी बोलल्या आणि त्याच दरम्यान आराध्यानं एका पापाराझीला काळजीपूर्वक फोटो काढण्यास सांगितलं. यानंतर दोघेही विमानतळाच्या आत प्रवेश करतात. ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांच्यातील बॉडिंग खूप अप्रतिम आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसल्या. ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन 13 व्या वर्षाची आहे. इतक्या लहान वयात खूप हुशार असल्याचं अमिताभ बच्चन यांनी अनेकदा म्हटलं आहे.