महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आयफा 2024साठी ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्याबरोबर अबू धाबीला पोहचली, व्हिडिओ व्हायरल - aaradhya BACHCHAN - AARADHYA BACHCHAN

IIFA 2024 :आयफा 2024 पुरस्कार सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या अबू धाबीला पोहचले आहेत. आता त्यांचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

IIFA 2024
आयफा 2024 (ऐश्वर्या राय बच्चन आराध्या (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 2:55 PM IST

मुंबई - IIFA 2024 : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA 2024)चा कार्यक्रम आज 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. अबुधाबीच्या बेटावर आयफा अवॉर्ड्स हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे. यासाठी शाहरुख खान, करण जोहर, शाहिद कपूर, रेखा, क्रिती सेनॉन आणि विकी कौशलसह अनेक स्टार्स अबुधाबीत पोहोचले आहेत. नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये आपली जादू दाखवणारी माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय आयफा अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी अबुधाबीला रवाना झाली होती. ऐश्वर्यासह तिची मुलगी आराध्या देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. अबुधाबी विमानतळावरून ऐश आणि तिच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडिओ व्हायरल : एअरपोर्टवरील व्हिडिओमध्ये ऐश्वर्या ही ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. आराध्या ही ब्लॅक अँड व्हाइट स्पोर्ट्स लूकमध्ये होती. या व्हिडिओमध्ये ऐश आणि तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत आहेत. ऐशचा पती अभिषेक बच्चन त्यांच्याबरोबर दिसला नाही. दरम्यान ऐश्वर्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं यावर लिहिलं की, 'आराध्या नेहमी तिच्या आईबरोबर असते, ती आजही शाळेत गेली नाही.' दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, 'ऐश तिच्या मुलीचं बालपण हिरावून घेत आहे.' आणखी एका यूजरनं लिहिलं, 'आपल्याला स्कूल फॉर आराध्या (SchoolforArdhya)हॅशटॅग ट्रेंड सुरू करण्याची गरज आहे.' काहीजणांनी म्हटलं की, ऐश्वर्या आपल्या मुलाला कधी एकटं का सोडत नाही.

आयफा 2024 सेलिब्रेशन 3 दिवस चालेल :ऐश्वर्या राय तिच्या मुलीबरोबर सासरपासून दूर राहत आहे. ती कुठेही आपल्या मुलीबरोबर जात असते. ऐश जिथे जाते तिथे अभिषेक तिच्याबरोबर नसतो, त्यामुळे ऐश आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्या वारंवार येत असतात. यावेळी आयफा 2024 हा कार्यक्रम 27 ते 29 सप्टेंबर असे तीन दिवस चालणार आहे. आयफा 2024च्या पहिल्या दिवशी चार साऊथ फिल्म इंडस्ड्रीचा उत्सव चालेल. दरम्यान दुसऱ्या दिवशी आयफा अवॉर्ड्स 2024चा पुरस्कार सोहळा होणार आहे. याशिवाय तिसऱ्या दिवशी 29 सप्टेंबर रोजी संगीत उद्योगासाठी आयफा अवॉर्ड्स 2024 रॉक्स कार्यक्रम आयोजित केला जाईल.

हेही वाचा :

  1. ऐश्वर्या रायनं घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा ब्रेक लावला, पॅरिस फॅशन वीकमध्ये लग्नाची अंगठी आली चर्चेत - Paris Fashion Week 2024
  2. सायमा 2024मधील ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याचा व्हिडिओ पाहिल्यावर चाहत्यांनी केलं कौतुक - SIIMA 2024
  3. सायमा 2024 पुरस्कार विजेत्यांची यादी, कोणी मारली बाजी जाणून घ्या... - SIIMA 2024

ABOUT THE AUTHOR

...view details