मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या सरस अभिनय प्रतिभेमुळं अमिताभ बच्चन यांना अनेक उपाध्या मिळाल्या आहेत. कोणी त्यांना 'बिग बी' म्हणतं तर कोणी 'सदी के महानायक' तर 'मेगास्टार', 'महानायक', 'शहेनशाह' अशा अनेक नावांनी ते ओळखले जातात. अमिताभ यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्तानी' चित्रपटापासून केली. आता त्यांचा हा गौरवशाली चित्रपट प्रवास गेली 55 वर्षे अखंडपणे सुरू आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अभिनेता म्हणून बॉलिवूडमधील त्यांच्या प्रवासाची AI आवृत्ती शेअर केली. आपल्या अभिनय कारकिर्दीला 55 वर्षे पूर्ण झाल्या उल्लेखही त्यांनी पोस्टमध्ये केलाय. अमिताभचे मन सिनेमा आणि त्याच्या निर्मितीने भरलेले दाखवणारी AI इमेज शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "55 वर्षे सिनेमाच्या या अद्भुत जगात.. आणि AI ने मला त्याचा अर्थ समजवला आहे."
अभिनेताव अमिताभ बच्चन भारतीय चित्रपटसृष्टीत 55 वर्षे पूर्ण करत आहेत या त्यांच्या खुलाश्याने चाहत्यांना आनंदी आणि नॉस्टॅल्जिक केलं आहे. एका चाहत्याने लिहिले, “बिग बी सर अप्रतिम व्यक्तिमत्व. तुमच्याकडे अप्रतिम कौशल्य आहे सर. हॅट्स ऑफ टू यू आणि मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी तुमचे चित्रपट पाहत आहे. तुम्ही आमच्यासाठी खरोखर प्रेरणा आहात. सर तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे.” आणखी एका चाहत्याने लिहिले, “चित्रपटात अमिताभ बच्चनची ५५ वर्षे. त्याच्या आधी कोणी नाही, त्याच्या नंतर कोणी नाही. अजेय ५५ वर्षे. जगातील सर्वोत्तम अभिनेता. अमिताभजींचे अभिनंदन. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो"