महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शाहरुख खानला लागला उन्हाचा चटका, अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल - SHAH RUKH KHANS HEALTH DETERIORATED - SHAH RUKH KHANS HEALTH DETERIORATED

Shah Rukh Khan बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रकृती खालावल्याने किंग खानला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan (File photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 7:36 PM IST

अहमदाबाद Shah Rukh Khan - अलिकडच्या काही दिवसांमध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. लोक दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळत आहेत. अशातच आज सुपर स्टार शाहरुख खानची तब्येत उन्हामुळे बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर किंग खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उन्हाचा त्रास झाल्यामुळे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची प्रकृती अचानकच खालावली. शाहरुखला त्रास होत असल्यानं अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयपीएलचा पहिला प्लेऑफ पाहण्यासाठी अभिनेता शाहरुख खान काल अहमदाबादला आला होता. त्यादरम्यान डिहायड्रेशनमुळे त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला तातडीने अहमदाबादच्या के डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शाहरुख या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी के डी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा वाढवली होती. मात्र, काही प्राथमिक उपचारानंतर किंग खानला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

शाहरुखला दवाखान्यात नेल्यानंतर एक वाजता सुट्टी देण्यात आली. त्यानतंर शाहरुख मुक्कामी असलेल्या त्यांच्या हॉटेलवर परतला. अहमदाबादमध्ये कडक उन्हामुळे शाहरुखची तब्येत अचानक बिघडली होती. मात्र शाहरुख लगेच मुंबईला परतला नाही. आजचा सामना असल्यानं शाहरुखनं येथेच राहणं पसंत केलं. त्यामुळे शाहरुखला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशिरा त्याची प्रकृती खालावल्याचंही काही सुत्रांच्या माहितीवरून सांगण्यात येत आहे. मात्र त्याला अधिकृत सुत्रांनी अजूनपर्यंत तरी पुष्टी दिलेली नाही. शाहरुखला त्रास झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र प्राथमिक उपचारानंतर 1 वाजता ते आपल्या हॉटेलवर परतले.

आयपीएलचा पहिला प्लेऑफ पाहण्यासाठी अभिनेता शाहरुख खान काल अहमदाबादला आला होता. त्यादरम्यान डिहायड्रेशनमुळे त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला तातडीने अहमदाबादच्या के डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता शाहरुखची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात येत आहे.

उन्हाचा त्रास होत असल्यानं प्रशासनानं अलिकडच्या काळात दुपारी गरज नसल्यास बाहेर पडू नये अशा सूचना अनेक शहरामध्ये दिल्या आहेत. तसंच काही दिवस उष्णतेची लाटही राहणार असल्याचं हवामान विभागानं नुकतंच जाहीर केलं होतं. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details