मुंबई - Sonali Bendre and Nora Fatehi : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीनं 'फेमिनिज्म'वर वादग्रस्त विधान केलं. एका मुलाखतीत तिनं 'फेमिनिज्म'सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसल्याचं म्हटलं होतं. तिनं 'द रणवीर' शोला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मला वाटतं, 'फेमिनिज्म'नं आपला समाज उद्ध्वस्त केला आहे.' यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर यांनी 'फेमिनिज्म'च्या खऱ्या अर्थावर आपले मत मांडले आहे. सोनालीनं जेनिस सिक्वेरा यांच्या मुलाखतीत म्हटलं, "लोकांना स्त्रीवादाचा खरा अर्थ कळत नाही, त्यामुळे चुकीची व्याख्या समाजात पसरली आहे."
श्रिया आणि सोनालीनं 'फेमिनिज्म'वर दिली प्रतिक्रिया : पुढं तिनं म्हटलं, "फेमिनिज्म'चा अर्थ पुरुषावर टीका करणं असा नाही. तुम्ही आणि मी समान हक्क शोधत आहोत आणि समान हक्क हवेत, मग त्यात गैर ते काय. तराजूचे संतुलन राखणे याला 'फेमिनिज्म' म्हणतात आणि हे समजावून सांगावे लागेल, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही." यानंतर श्रिया आणि जयदीप यांनी 'फेमिनिज्म'चा खरा अर्थ सांगितला. जेनिस सिक्वेरा यांच्याशी बोलताना, 'फेमिनिज्म'वरील प्रश्नावर श्रिया पिळगावकरनं सर्वप्रथम प्रतिक्रिया म्हटलं, "लोकांनी गुगलवर 'फेमिनिज्म'ची व्याख्या शोधली नाही. 'फेमिनिज्म' समान हक्कांबद्दल बोलतो आणि मला असं वाटतं की, अनेकजण स्त्रीवादी आहेत. 'फेमिनिज्म'चा विचार हा अधिकारांबद्दल आहे." जयदीपनं देखील आपली प्रतिक्रिया यावेळी मांडली.