मुंबई - Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडे अभिनयापेक्षाही तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. अनन्यानं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघडपणे सांगितली होती. बऱ्याच दिवसांपासून तिच्याबद्दल बोललं जात आहे की, तिनं बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरबरोबर ब्रेकअप केलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर अनेकदा दिसणारे लव्ह बर्ड्स आजकाल एकत्र कुठेही दिसत नाहीत. सध्या दोघांनीही त्याच्या ब्रेकअपबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान आता सोशल मीडियावर नवीन चर्चाही सुरू झाली आहे. अनन्याला पुन्हा एकदा नवीन प्रेम मिळाल्याचं बोललं जात आहे. अनेक दिवसांपासून अनन्या पांडेच्या आयुष्यात नवीन प्रेमानं प्रवेश केल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत.
कोण आहेअनन्या पांडेचा बॉयफ्रेंड ? : आता तिचा कथित बॉयफ्रेंड कोण आहे, ज्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होत आहे. दरम्यान याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अलीकडे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये अनन्याला एका व्यक्तीनं आपल्या मीठीत पकडलेले होते. हा फोटो अनंत अंबानी यांच्या लग्न समारंभातील आहेत. अनन्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या अफेअरच्या अफवेला उधाण आलं. अनेकजण तिला विचारू लागले, की तिच्याबरोबर कोण व्यक्ती आहे ? ही चर्चा सुरू असतानाच, अनन्यान कथित बॉयफ्रेंडबरोबरचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये हा व्यक्ती अनन्याच्या आगामी वेब सीरीज 'कॉल मी बे' प्रमोशन करताना दिसला.