महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सारा अली स्टारर 'ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ - ऐ वतन मेरे वतनचा ट्रेलर

Ae Watan Mere Watan Trailer out : सारा अली खानचा देशभक्तीपर चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर आज 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल.

Ae Watan Mere Watan Trailer out
'ऐ वतन मेरे वतनचा ट्रेलर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 1:40 PM IST

मुंबई - Ae Watan Mere Watan Trailer out :अभिनेत्री सारा अली खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन'ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. सारा अली खान पहिल्यांदाच देशभक्तीपर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील साराचा लूक आणि भूमिका यापूर्वीच समोर आली आहे. तिचा हा लूक अनेकांना आवडला होता. दरम्यान ‘ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर हा आज 4 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. सारा अली खान स्टारर 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपट हा करण जोहरचा बॅनर धर्मा एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत बनला आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते सोमेन मिश्रा आहेत. ‘ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाचे दिग्दर्शक कन्नन अय्यर आहेत.

'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित : ‘ऐ वतन मेरे वतन'चा 2.53 मिनिटांचा ट्रेलर सुरुवातीपासूनच दमदार दिसत आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची नजर घड्याळावर आहे, ज्यात साडेआठ वाजणार आहेत आणि दुसरीकडे उषा मेहताच्या भूमिकेत सारा अली खान रेडिओबद्दल एका व्यक्तीबरोबर बोलताना दिसत आहे. यानंतर ट्रेलरमध्ये काही इंग्रज हे लाठीचार्ज करताना दिसत आहेत. ‘ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर खूप जोरदार आहे. उषा मेहताच्या भूमिकेत सारा अली खाननं तिच्या लूक आणि अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाबद्दल :देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या भारत छोडो आंदोलनावर (1942) आधारित, सारा अली खान स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ऐ वतन मेरे वतन'ची कहाणी दारब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी संयुक्तपणे तयार केली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ ( Amazon Prime Video) वर 21 मार्च रोजी रिलीज होणार आहे. ‘ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटाची वाट अनेकजण पाहत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत आहेत.

हेही वाचा :

  1. सिद्धार्थ मल्होत्रासह करिना कपूरची अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये हजेरी, सोशल मीडियात शेअर केले फोटो
  2. WATCH : 'मस्त मलंग झूम' पर रकुल-जैकी ने मिलाए डांस स्टेप्स, न्यूलीवेड्स की केमिस्ट्री जीत लेगी दिल
  3. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात थिरकले तिन्ही खान

ABOUT THE AUTHOR

...view details