महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आदर्श गौरवने 'एलियन्स'च्या शूटिंगला केली सुरुवात, सहकाऱ्यांसह चाखला स्थानिक जेवणाचा स्वाद - खो गए हम कहाँ

Adarsh Gourav starts shooting for Aliens : अभिनेता आदर्श गौरवने आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट 'एलिएन्स' या टीव्ही मालिकेच्या शुटिंगला थायलंडमध्ये सुरूवात केली. या मालिकेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार त्याच्यासह काम करत आहेत. त्यांच्याशी त्याची चांगली मैत्री जुळली असून त्यांच्यासह त्याने स्थनिक पाककृतींचा आनंद घेतला.

Adarsh  Gourav
आदर्श गौरव

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 5:28 PM IST

मुंबई - Adarsh Gourav starts shooting for Aliens : अलिकडेच अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत 'खो गए हम कहाँ' चित्रपटात दिसलेल्या आदर्श गौरवने थायलंडमध्ये 'एलियन्स' या टीव्ही मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने सहकलाकारांशी चांगले संबंध ठेवले आणि स्थानिक पाककृतीचा मनसोक्त आनंद घेतला.

'एलियन्स' या टीव्ही मालिकेबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना, तो म्हणाला, "'एलियन्स'चा भाग होण्यासाठी आणि अशा प्रतिभावान कलाकार आणि क्रूसह या मस्त प्रवासाला सुरुवात करताना मला खूप आनंद झाला आहे. नोहा हॉले आणि रिडले स्कॉट सारख्या प्रसिद्ध निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. मी खरोखर विनम्र आहे आणि ही आकर्षक कथा जिवंत करण्यास मी उत्सुक आहे."

"गेल्या वर्षी आम्हाला मिळालेल्या एका छोट्याशा शूटिंग शेड्यूलनंतर या प्रोजेक्टसाठी मी उत्साहित आहे. टीम आणि कलाकारांमध्ये खूप एनर्जटिक वाटत आहे आणि आम्ही फ्रँचायझीप्रमाणेच ही मालिका प्रतिष्ठित बनण्यासाठी आम्ही सर्व ऊर्जा पणाला लावू. "तो जोडला.

आदर्श गौरव हे एलियन्सची मन गुंतवून ठेवणारी कथा जिवंत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कलाकार आणि क्रू सोबत काम करत आहे. पुढील चार महिने या मालिकेचे थायलंडमध्ये शूटिंग होणार आहे.

'खो गये हम कहाँ' मधील त्याच्या कामासाठी आदर्शला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नवोदित दिग्दर्शक अर्जुन वरैन सिंग यांनी दिग्दर्शित केलेली, 'खो गये हम कहाँ'मधील त्याच्या कामाचे सर्व थरातून कौतुक केलं गेलं. याबद्दल बोलताना गौरव आधी म्हणाला होता, "माझ्यासारख्या अभिनेत्यांवर विश्वास ठेवला त्याबद्दल मी झोया अख्तर सारखी निर्माती आणि चित्रपटाच्या इतर निर्मात्यांचा मनापासून आभारी आहे.

झोया ही एक गतिमान दिग्दर्शिका आहे जिची प्रतिभा निष्कलंक आहे आणि तिच्या या बहुप्रतिक्षित प्रकल्पातील 'खो गये हम कहाँ' कलाकृतीचा एक भाग होण्याचा मला बहुमान वाटतो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की त्यांनी माझे काम ओळखले आणि मला यासारख्या सारख्या भूमिका दिल्या आहेत.

'एलियन्स' बद्दल बोलायचे तर प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक नोहा हॉले यांनी दिग्दर्शित केलेला आणि दूरदर्शी रिडले स्कॉट निर्मित, एलियन्स हे एक चित्तवेधक कथानक आहे. आदर्श गौरवसह या टीव्ही मालिकेत सिडनी चँडलर, अ‍ॅलेक्स लॉथर, सॅम्युअल ब्लेंकिन आणि एसी डेव्हिस हे कलाकार सामील झाले आहेत.

हेही वाचा -

  1. आर्यन खान प्रकरणी 25 कोटींची लाच मागितल्याबद्दल ईडीनं समीर वानखेडेवर केला गुन्हा दाखल
  2. हिंदीतील 'सालार' चित्रपटाच्या ओटीटी स्ट्रिमिंगची प्रतीक्षा संपली, या तारखेला होणार स्ट्रिमिंग
  3. शाहिद आणि क्रिती अभिनीत 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' ची संथ गतीनं कमाई

ABOUT THE AUTHOR

...view details