महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अदा शर्मानं नेसली आजीची साडी; किंमत कळल्यावर व्हाल थक्क! - Adah Sharma - ADAH SHARMA

Adah Sharma : 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मानं तिच्या साडीची किंमत सांगितल्यानंतर अनेकजण थक्क झाले आहेत. आता तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Adah Sharma
अदा शर्मा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 11:58 AM IST

मुंबई - Adah Sharma : 'द केरळ स्टोरी' अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. अदा शर्माच्या साडीची किंमत ऐकणाऱ्याला थक्क करणाराी आहे. महागाईच्या जमान्यात अदा 15 रुपयांच्या साडीत दिसत आहे. गेल्या मंगळवारी, अदा मुंबईतील एका दुकानाबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी तिनं केशरी आणि पांढऱ्या रंगसंगतीची साडी नेसली होती. या साडीतल्या 'एथनिक लूक' मध्ये तिनं पापाराझींना फोटोसाठी पोझ देखील दिली. अनेकांनी तिचं कौतुक केलं, तिच्या साडीबद्दल विचारलं. यावर तिनं खूप सुंदर उत्तर दिलं. अदानं दिलेल्या उत्तर ऐकल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले.

अदा शर्माचा व्हिडिओ व्हायरल : पापाराझीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अदा एका दुकानाबाहेर दिसत आहे. केशरी आणि पांढऱ्या रंगसंगतीच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. तिनं तिच्या पाठीवर काळी बॅग घेतली होती. मॅचिंग स्नीकर्स आणि ब्लॅक सनग्लासेसनं तिनं तिचा लूक पूर्ण केला होता. यादरम्यान एका महिलेनं अदाला तिच्या साडीची किंमत विचारली. अदा शर्मानं साडीची किंमत 15 रुपये असल्याचं सांगितलं. या विधानानं पापाराझींना खूप आश्चर्य वाटले. तिनं स्पष्ट केलं की ही साडी तिच्या आजीची आहे. यानंतर तिनं म्हटलं की, ''आजीची साडी असल्यानं तुम्ही कोणतीही किंमत ठरवू शकत नाही. त्याची किंमत करोडोंमध्ये आहे.''

अदा शर्माचे आगामी चित्रपट :अदा शर्माला 15 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत आहे. ती '1920' आणि 'हसी तो फसी' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. गेल्या वर्षी विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तेव्हापासून ती खूप चर्चेत आहे. 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर खूप कमाई केली होती. दरम्यान तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती 'बस्तर: नक्षल स्टोरी'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 मार्च रोजी प्रदर्शित होईल. याशिवाय ती 'क्वेश्चन मार्क'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माबरोबर मूव्ही डेटवर, व्हिडिओ व्हायरल - Tamannaah and vijay
  2. अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिली सुंदर पोस्ट - Allu Ayaan birthday
  3. वरुण धवनने शेअर केला 'बेबी जॉन' सेटवरील फोटो, शूटिंगचा '७० वा दिवस' असल्याचा केला खुलासा - Varun Dhawan next movie

ABOUT THE AUTHOR

...view details