मुंबई - Vidya Balan On Nepotism:हिंदी चित्रपटसृष्टीमधील सुंदर अभिनेत्री विद्या बालन तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही 'हम पांच' या मालिकेपासून केली होती. यानंतर तिनं एका म्युझिक अल्बममध्ये काम केलं. यानंतर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप संघर्ष केला. शेवटी तिला संजय दत्त आणि सैफ अली खान यांच्याबरोबर 2005मध्ये 'परिणीता' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिचा या चित्रपटमधील अभिनय अनेकांना आवडला आणि तिला अनेक ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर तिनं अनेक चित्रपटामध्ये काम केलं. दरम्यान आता विद्या बालननं नेपोटिझमबद्दल एक खुलासा केला आहे.
नेपोटिझमवर विद्यानं बालननं केला खुलासा : विद्याला अलीकडेच एका मुलाखती विचारे की, नेपोटिझमचा कधी फटका सहन करावा लागला आहे. यावर तिनं म्हटलं, "मला या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हे मला कधीच कळले नाही. कोणाच्याही बापाची फिल्म इंडस्ट्री नाही, नाहीतर प्रत्येक बापाचा मुलगा, प्रत्येक बापाची मुलगी यशस्वी झाली असती." 'मला असे वाटते की मी एकटी रेंजर आहे'. संधींच्या बाबतीत मला वाटत नाही की माझा वाटा कोणी नाकारू शकेल. त्यामुळे, मला वाटते की यात काही फरक पडत नाही. टॅलेंटमुळे ऑफर्स मिळतात, असं तिनं म्हटलं. याशिवाय तिनं पुढं सांगितलं की, तिच्या पूर्वीच्या नात्यामध्ये फसवणूक झाली होती.